Cinema starring NCP MP Amol Kolhe is reprehensible says Jayant Patil : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी एका सिनेमात नथुराम गोडसे ही व्यक्तीरेखा साकारली आहे. पण पुरोगामी विचारांचे समर्थन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सिनेमात स्वतःच्याच खासदाराने केलेली भूमिका निषेधार्ह वाटत आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी २०१७ मध्ये 'त्या' सिनेमामध्ये भूमिका केली आहे त्यामुळे नोटीस काढायची व या गोष्टीचा एवढा बाऊ करण्याची आवश्यकता नाही. तो सिनेमा नक्कीच निषेधार्ह आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. नथुराम गोडसे यांच्या उदात्तीकरणाचा कोणताही सिनेमा निघत असेल तर त्याविषयी जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
मी अमोल कोल्हे यांनी भूमिका साकारलेला 'तो' सिनेमा बघितलेला नाही आणि त्यासाठी मुद्दाम वेळ खर्ची घालण्याची इच्छा नाही. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याआधीच त्या सिनेमात काम केले होते. पण हा सिनेमा एवढ्या उशिराने का प्रदर्शित होत आहे ते माहिती नाही.
छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका करुन घराघरात पोहोचलेल्या अमोल कोल्हे यांनी लोकसभेत शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन भाषणे केली आहे; असे जयंत पाटील म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.