जामिया हिंसाचाराचे पडसाद राज्यासह मुंबईतही; विद्यार्थ्यांचं आंदोलन, निदर्शनं

मुंबई
Updated Dec 16, 2019 | 22:18 IST

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरून देशभरात जोरदार आंदोलनं सुरू आहेत. या आंदोलनात विद्यार्थी सर्वांत पुढे असल्याचं दिसत आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद येथील विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं,

Mumbai protest
जामिया हिंसाचाराचे पडसाद राज्यासह मुंबईतही  

थोडं पण कामाचं

  • नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरून देशभरात जोरदार आंदोलनं सुरू आहेत.
  • या आंदोलनात विद्यार्थी सर्वांत पुढे असल्याचं दिसत आहे.
  • दिल्लीतल्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या हल्ल्याचे पडसाद राज्यातही उमटले आहेत.

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरून देशभरात जोरदार आंदोलनं सुरू आहेत. या आंदोलनात विद्यार्थी सर्वांत पुढे असल्याचं दिसत आहे. दिल्लीतल्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या हल्ल्याचे पडसाद राज्यातही उमटले आहेत. मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद येथील विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन करत निषेध केला आहे. विद्यार्थी प्रचंड आक्रमक झालेले दिसले. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्येही छात्रभारती आणि इतर विद्यार्थी संघटनांनी जोरदार आंदोलनं सुरू केलं आहे. या आंदोलनात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. 

देश वाचवा, संविधान वाचवा, अशा घोषणानी विद्यार्थ्यांनी कॅम्पसचा परिसर दणाणून सोडला. भाजप सरकार या देशात धर्माच्या आणि जातीच्या नावानं भेद निर्माण करत असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला. कलिना विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून एनआरसीला विरोध केला गेला.  या आंदोलनात छात्रभारती, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन, सीवायएसएस, एसएफआय, एआयएसएफ, जेएसी, एनएसयूआय, पीएसयू, एआयपीसी, एआयडब्लू, टाटा सोशल विद्यार्थी युनियन, एसआयओ आणि एनसीपी युथ विंगसह प्राध्यापक आणि पुरोगामी सामाजिक संघटना सहभागी झाल्य होत्या. 

Mumbai protest

तर पुण्यातही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. औरंगाबादमध्येही मौलाना आझाद कॉलेजमधील शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून या घटनेचा जोरदार निषेध केला.  

या कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी कॉंग्रेस महासचिव प्रियंका गांधी इंडिया गेटवर धरणे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. प्रियंका यांच्यासमवेत कॉंग्रेस काही नेते आणि कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी झाले.  गेल्या काही दिवसांपासून जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ आणि अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा हिंसाचार सुरू आहे. कायद्याला या विद्यार्थ्यांनी जोरदार विरोध दर्शविला आहे. आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर पोलीस आणि विद्यार्थी यांच्यात आणखी जुंपली आणि आंदोलन अधिक तीव्र, हिंसक झाले. परिणामी देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कॉंग्रेसने केंद्र सरकारला घेराव घातला

कॉंग्रेसचे गटनेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, देशात जे घडत आहे त्यास सरकारचे धोरण जबाबदार आहे. जर भारत सरकारनं हे विधेयक आणले नसते तर जे काही होत आहे ते झाले नसते. यासोबतच त्यांनी म्हटलं की, जामिया मिलिया इस्लामिक विद्यापीठाच्या ग्रंथालयात जे काही झालं त्यासाठी केंद्र सरकारचं पूर्णपणे जबाबदार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...