रस्ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री; सीएम शिंदेंचा थेट डॉं. शिंदेंना फोन, म्हणाले उपचारात कसूर नको

मुंबई
भरत जाधव
Updated Jul 07, 2022 | 08:15 IST

शिवसेनेत (Shiv Sena) बंड करून सरकार (Government) स्थापन केलेले आणि मुख्यमंत्री (Chief Minister) पदावर विराजमान झालेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कामाला जोरात लागले आहेत. विधानसभेत (Legislative Assembly) भाषण देताना मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या काम करण्याची पद्धत कशी असेल हे सांगितलं होतं. अगदी त्यापद्धतीने मुख्यमंत्री काम करताना दिसत आहेत.

 CM Shinde rushed to the aid of Warakaris injured in the accident
अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीला धावले सीएम शिंदे  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मिरजेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांना फोन
  • वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश
  • रस्ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची प्रकृती स्थिर

मुंबईः शिवसेनेत (Shiv Sena) बंड करून सरकार (Government) स्थापन केलेले आणि मुख्यमंत्री (Chief Minister) पदावर विराजमान झालेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कामाला जोरात लागले आहेत. विधानसभेत (Legislative Assembly) भाषण देताना मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या काम करण्याची पद्धत कशी असेल हे सांगितलं होतं. अगदी त्यापद्धतीने मुख्यमंत्री काम करताना दिसत आहेत. पंढरपूर आणि वारकरींकडे लक्ष ठेवून असलेले मुख्यमंत्री यांनी वारकऱ्यांचा अपघात झाला होता, त्यांच्या उपचारासाठी त्यांनी थेट डॉ. शिंदेंना फोन लावला. 

सांगली येथील रस्ते अपघातात वारकरी जखमी झाले होते. या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ आज एक भीषण अपघात घडला. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पीक अप जीप घुसून झालेल्या या अपघातात १४ वारकरी जखमी झाले. जखमींना तातडीने मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मिरजेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांना फोन लावून या वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यासोबत त्यांना लागतील ते सर्व उपचार करावेत. वेळ पडल्यास त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करावे त्यांच्यावरील उपचारात कोणतीही कसूर ठेवू नका, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. विशेष म्हणजे उपचारासाठी लागणारा खर्च स्वत: उचलण्याची तयारी मुख्यमंत्री शिंदेंनी दर्शवली आहे. 

या रस्ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. त्यांना लागतील ते सर्व उपचार देऊ असे डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथील वारकरऱ्यांची पायी दिंडी ही पंढरपूरला निघाली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी येथे ही वारी पोहोचली असता, मागून आलेल्या भरधाव पीकअप जीप गाडीने आधी दिंडीत असणाऱ्या छोटा हत्ती या टेम्पोला जोरदार धडक दिली. त्यानंतर गाडी पायी निघाललेल्या दिंडीमध्ये घुसून पलटी झाली.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी