मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको!

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 08, 2022 | 18:07 IST

CM convoy does not want special protocol in travel : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले

CM convoy does not want special protocol in travel
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको!  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको!
  • मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना वाहतूक रोखून ठेवण्यात येते
  • यापुढे असे करू नका, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

CM convoy does not want special protocol in travel : मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.  पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले.

CM एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदी-शहांशी करणार चर्चा; फडणवीसांसाठी धोक्याची घंटा?

मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गिकेवरील बंदोबस्त कमी करुन कुठेही वाहने अडवली जाणार नाही याची खबरदारी घ्या, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आपले सरकार हे सामान्यांचे सरकार आहे यामुळे हे सरकार व्हीआयपींपेक्षा सामान्यांना प्राधान्य देईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्री या नात्याने सतत प्रवास करावा लागतो. या प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी प्रवास मार्गावरील वाहतूक रोखण्यात येते. यामुळे वाहतूक कोंडी होते. तसेच बंदोबस्तासाठी अनेक पोलीस तैनात केले जात असल्याने पोलीस दलावर कामाचा ताण वाढत असल्याचे गेले तीन चार दिवस प्रवास करताना मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो. अतिमहत्वाच्या कामांसाठी निघालेल्या लोकांचा खोळंबा होतो. रुग्णवाहिका त्या कोंडीत अडकून पडली तर रूग्णाच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो . त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची सुत्रं हाती घेतल्यानंतर आपल्या या प्रवासाचा नाहक त्रास वाहनचालकांना नको, अशी मुख्यमंत्री शिंदे यांची भूमिका आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी