Anil Parab Resort: अनिल परबांना झटका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

मुंबई
सुनिल देसले
Updated Aug 25, 2022 | 13:56 IST

Anil Parab Sai Resort: अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्ट संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

CM Eknath Shinde gives order to demolition order of Anil Parab Sai resort claim by Kirit Somaiya
Anil Parab Resort: अनिल परबांना मोठा झटका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय 
थोडं पण कामाचं
  • माजी मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ
  • दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याचा सोमय्यांचा दावा
  • दिवाळीपूर्वी अनिल परबांचे रिसॉर्ट इतिहासजमा होणार - सोमय्या

Anil Parab Sai Resort: राज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचे वादग्रस्त साई रिसॉर्ट (Sai Resort) पाडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हा दावा केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिसॉर्ट पाडण्याचे आदेश रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. 

किरीट सोमय्या यांनी म्हटलं, काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल परब यांचं रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर सही केली आहे. पर्यावरण मंत्रालयाकडे ही फाईल आली आहे. ते रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना आज दुपारपर्यंत आदेश देतील असं मला कळालं आहे. हे रिसॉर्ट पीडब्ल्यूडी पाडणार की जिल्हाधिकारी टेंडर मागवणार याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रिसॉर्ट पाडण्यात येईल असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे. 

शनिवारी मी दापोलीत जाणार आहे. दिवाळीपर्यंत अनिल परब यांचं रिसॉर्ट हे इतिहासजमा झालेलं असेल असंही सोमय्यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा : राज ठाकरे अँक्शन मोडवर येताच मनसेला गवसला फॉर्म; आजपासून सदस्य नोंदणी मोहीम सुरू

रिसॉर्ट तर पाडलं जाणार आहे आणि त्यासोबतच या रिसॉर्टसाठी पैसे कुठून आले याचाही तपास आता वेगाने होईल असाही दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

अनिल परब यांचे दापोली-मुरुड समुद्र किनाऱ्यावर असलेले साई रिसॉर्ट हे नियमांचे उल्लंघन करुन बांधल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या संदर्भातील सर्व कागदपत्रेही सोमय्यांनी सादर केली होती. त्यानंतर आता रिसॉर्ट तोडण्याच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांनी सही केल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे.

या रिसॉर्टच्या बांधकामात सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाले आहे. तसेच विनापरवानगी आणि कायद्याचे उल्लंघन करुन रिसॉर्टचं बांधखाम झाले आणि या रिसॉर्टच्या बांधकामासाठी देण्यात आलेल्या पैशांच्या संदर्भातही सोमय्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. 

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या या दाव्यावर अद्याप अनिल परब यांची कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी