Eknath Shinde । नवी दिल्ली : शिवसेनेचे 12 खासदार हे ईडीच्या चौकश्या या सर्व प्रकारांमुळे आले आहेत. त्यांचा आणि बाळासाहेबांच्या विचारांचा काही संबंध नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संजय राऊतांना मॅटनी शो बंद पडला आहे. दुसरं कोणी बोललं असत तर त्याची दखल घेतली असती.
अधिक वाचा : Beautiful शनाया कपूर आणि तिची ग्लॅमरस अदा
आज शिवसेनेच्या 12 खासदारांनी वेगळा गट निर्माण करून गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती केली त्यानंतर त्यांनी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांनी संजय राऊत यांच्याबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी ते म्हणाले, खासदारांना दबाव टाकून आणलं आहे की नाही या संदर्भात नवे गटनेते राहुल शेवाळे आपलं मत मांडतील. पण आणखी कोणी बोललं असतं या विषयावर तर त्याची दखल घेण्यासारख होतं. पण जे सकाळी रोज मॅटनी शो करत बोलायचे, तो मॅटनी शो आता बंद झाला आहे, असे म्हणत संजय राऊत यांच्यावर प्रतिहल्ला केला आहे.
अधिक वाचा : कावेरीने राजला नेसवली नऊवारी साडी
मला या संदर्भात काही बोलावसे वाटत नाही. कारण ते दखल घेण्यासारखे नाही आहेत. मला काय तुम्हांला माहिती आहे. तुम्हांला रोज काहीना काही मिळतं म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जातात. पण त्यांची दखल घेण्याची गरज नाही असे रोखठोक मत एकनाथ शिंदे यांनी मांडून संजय राऊत यांनी अनुल्लेखाने टोमणा मारला आहे.
1) श्रीकांत शिंदे
2) राहुल शेवाळे
3) हेमंत पाटील
4) राजेंद्र गावित
5) संजय मंडलिक
6) प्रतापराव जाधव
7) सदाशिव लोखंडे
8) भावना गवळी
9) हेमंत गोडसे
10) कृपाल तुमाने
11) श्रीरंग बारणे
12) धैर्यशील माने
हे बारा खासदार पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी 12 खासदार का आले या संदर्भात स्पष्टीकरण दिले. बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी खासदारांनी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
पाहा मुख्यमंत्री शिंदेची दिल्लीतील पत्रकार परिषद जशीच्या तशी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत पत्रकार परिषदमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत पत्रकार परिषद Posted by Times Now Marathi on Tuesday, July 19, 2022
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.