Dahi Handi in Mumbai Thane Maharashtra: दहीहंडीचा उत्सव मुंबई, ठाणे शहरासह संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहात होतो. दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची मागणी होत असतानाच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. दहीहंडीचा समावेश आता साहसी खेळात करण्यात आला आहे. तसेच प्रो कबड्डीच्या धर्तीवर आता प्रो दहीहंडी स्पर्दा भरवण्यात येणार आहे. (CM Eknath Shinde made big announcement for Govinda will organise Pro Dahi Handi like Pro Kabaddi)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, विधानसभेचे सदस्य प्रताप सरनाईक यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी लावून धरली होती की, दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी मिळावी. त्याचसोबत गोविंदांचा विमा काढावा. तसेच या खेळाचा समावेश साहसी खेळांमध्ये व्हावा अशी मागणी होती. सुनील प्रभू यांनीही विम्याच्या संदर्भात मुद्दा उपस्थित केला. आता दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केलीच आहे.
अधिक वाचा : मुलुखमैदानी तोफ असलेल्या गुलाबराव पाटलांना नीलम गोऱ्हेंनी सुनावलं, पाहा नेमकं काय घडलं?
दुर्दैवाने दहीहंडी दरम्यान गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये शासनाच्या वतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. जबर जखमी झालेल्या गोविंदांना आर्थिक मदत म्हणून साडे सात लाख रुपये तर हात-पाय फ्रॅक्चर झाल्यास (होऊ नये पण दुर्दैवाने झाल्यास) पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे म्हटलं, दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश करण्याच्या संदर्भात अनेक वर्षांपासून सर्वच गोविंदांची मागणी होती. त्यामुळे आता या मागणीनुसार, गोविंदा उत्सवाचा समावेश क्रीडा प्रकारात करुन प्रो गोविंदा स्पर्धा राबवण्यात येणार. या स्पर्धा राज्य शासनाकडून सुरू झाल्यास स्पर्धकांना बक्षीसाची रक्कम ही शासनाकडून मिळेल त्याचबरोबर इतर खेळांप्रमाणे या गोविंदांना देखील शासकीय नोकरीत जो काही शासकीय कोटा आहे त्याचाही लाभ घेता येईल. तसेच शासनाच्या इतरही सुविधांचाही लाभ गोविंदांना घेता येईल.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.