Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावरील अपघात कमी व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 04, 2023 | 06:27 IST

cm eknath shinde meeting road safety council over balasaheb thackeray samruddhi mahamarg accident, highway accident news : ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्या. अपघात रोखण्यासाठी महामार्गावरील अपघात प्रवण ठिकाणी विशेष उपाययोजना कराव्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

cm eknath shinde meeting
अपघात कमी व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • अपघात कमी व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना
  • समृद्धी महामार्गावरील अपघात कमी व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना
  • अपघातांची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

cm eknath shinde meeting road safety council over balasaheb thackeray samruddhi mahamarg accident, highway accident news : ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्या. अपघात रोखण्यासाठी महामार्गावरील अपघात प्रवण ठिकाणी विशेष उपाययोजना कराव्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. समृद्धी महामार्गावर मागील तीन महिन्यात लहान मोठे मिळून 900 पेक्षा जास्त अपघात झाले. या अपघातांची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. 

मुंबईत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची बारावी बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. 

मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळलेच पाहिजेत. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अपघात रोखण्यासाठी सर्व संबंधित विभाग व यंत्रणांनी उपाययोजना कराव्यात. ब्लॅक स्पॉट कमी करण्यात यावेत. अपघात होण्यास कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे संबंधित यंत्रणांनी हटवावीत. रात्री गस्तीचे प्रमाण वाढविण्यात यावे. अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळण्याची गरज असते. त्यादृष्टीने ट्रॉमा केअर सेंटरमधील सुविधा वेळेवर उपलब्ध असल्या पाहिजेत. एअर अॅम्बुलन्स सुविधाही त्वरित उपलब्ध करुन देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी. सुप्रीम कोर्टाच्या सूचनांनुसार सर्व उपाययोजना कराव्या. शून्य अपघाताचे उद्दिष्ट समोर ठेवून जिल्हा स्तरावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश  मुख्यमंत्र्यांनी दिले. शालेय स्तरापासूनच वाहतूक सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यात यावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रात 109 ट्रॉमा केअर सेंटर

महाराष्ट्रात 109 ट्रॉमा केअर सेंटर कार्यरत असून 108 क्रमांकाच्या 937 अॅम्बुलन्स 24 तास कार्यरत आहेत. वाहनांच्या तपासणीसाठी 23 ठिकाणी अद्ययावत स्वयंचलित वाहन चाचणी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. 18 अॅटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकचे काम सुरू आहे.

Safest SUV In India : अपघात झाल्यास आतल्या प्रवाशांचा जीव वाचवू शकणाऱ्या SUV, किंमत 6 लाखांपासून सुरू

Daily Horoscope 4 April 2023 : मंगळवार 4 एप्रिल 2023 चे राशीभविष्य

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी