मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राहुल गेठे यांना जीवे मारण्याची धमकी, नक्षलवाद्यांनी लाल शाईने लिहिले धमकीचं पत्र

मुंबई
सुनिल देसले
Updated Nov 01, 2022 | 10:57 IST

Dr Rahul Gethe gets threat from Naxalists: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी असलेल्या डॉ. राहुल गेठे यांना नक्षलवाद्यांकडून धमकी आली आहे. डॉ. राहुल गेठे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 

CM Eknath Shinde special duty officer dr rahul gethe receive threat letter from naxalists read in marathi
मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राहुल गेठे यांना जीवे मारण्याची धमकी 
थोडं पण कामाचं
  • डॉ. राहुल गेठे यांना नक्षलवाद्यांकडून धमकी
  • डॉ. राहुल गेठे मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी 
  • लाल शाईने लिहिलेल्या पत्रातून गेठे यांना जीवे मारण्याची धमकी

CM Eknath Shinde's special duty offer Dr Rahul Gethe gets threat from Naxalists: एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी असलेल्या डॉ. राहुल गेठे यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राच्या माध्यमातून डॉ. राहुल गेठे यांना ही धमकी देण्यात आली आहे. (CM Eknath Shinde special duty officer dr rahul gethe receive threat letter from Naxalists read in marathi)

हे पण वाचा : 12 राशींपैकी सर्वाधिक यशस्वी रास कोणती?

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. राहुल गेठे यांना साधारणत: एक आठवड्यापूर्वी हे धमकीचं पत्र आलं आहे. राहुल गेठे यांच्या निवासस्थानी हे पत्र आलं आहे. जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र आल्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

हे पण वाचा : तुम्ही केलं असेल हे काम तर 6 वर्षांनंतर मिळतील 2 लाख रुपये

डॉ. राहुल गेठे हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणजेच ओएसडी आहेत. एकनाथ शिंदे हे यापूर्वी मविआ सरकारमध्ये गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी गडचिरीलो जिल्ह्यात अनेक विकासकामे हाती घेतली होती. तेव्हापासून एकनाथ शिंदे यांनाही यापूर्वी नक्षलवाद्यांकडून धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी ओएसडी डॉ. राहुल गेठे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी