महाराष्ट्रात केंद्राच्या योजनांद्वारे जनतेला दिलासा देणार?

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 15, 2021 | 22:39 IST

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर नागरिकांना दिलासा देण्याची तयारी सुरू आहे. राज्य सरकार केंद्राच्या वेगवेगळ्या जनहिताच्या योजना महाराष्ट्रात राबवण्याच्या तयारीत आहे.

cm thackeray and minister bhujabal wrote letters to pm modi
महाराष्ट्रात केंद्राच्या योजनांद्वारे जनतेला दिलासा देणार? 

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रात केंद्राच्या योजनांद्वारे जनतेला दिलासा देणार?
  • राज्य सरकार केंद्राच्या जनहिताच्या योजना महाराष्ट्रात राबवण्याच्या तयारीत
  • मुख्यमंत्री ठाकरे आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

मुंबईः कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर नागरिकांना दिलासा देण्याची तयारी सुरू आहे. राज्य सरकार केंद्राच्या वेगवेगळ्या जनहिताच्या योजना महाराष्ट्रात राबवण्याच्या तयारीत आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ या दोघांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. cm thackeray and minister bhujabal wrote letters to pm modi

केंद्र सरकारने महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी कल्याणकारी योजना राबवाव्या अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ या दोघांनी पत्राद्वारे केली. केंद्राची मदत मिळाली तर कोरोना संकटावर नियंत्रण मिळवता येईल, परिस्थिती हाताळता येईल असा विश्वास असल्यामुळेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी केंद्राकडे सहकार्याची मागणी केली आहे. 

महाराष्ट्रात ६ लाख २० हजार ६० कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ऑक्सिजन (oxygen) आणि रेमडेसिविर (Remdesivir) इंजेक्शन यांचा तुटवडा भासत आहे. सध्या राज्यात दररोज १२०० मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होते. पण एप्रिल अखेर पर्यंत राज्याची ऑक्सिजनची मागणी दोन हजार मेट्रिक टनवर पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे राज्याला परराज्यांमधून हवाईमार्गे ऑक्सिजन आणण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. 

रेमडेसिविरची निर्यात थांबवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. तसेच निर्यातदारांना देशांतर्गत व्यवसायासाठी कायमस्वरुपी परवानगी देण्याची मागणी मुख्यंत्र्यांनी केली. राज्यात अंत्योदय अन्न योजना राबवण्यासाठी तसेच प्राधान्य गटातील शिधापत्रिका धारकांना प्रति प्रौढव्यक्ती दररोज १०० रुपये आणि मुलांना दररोज प्रत्येकी ६० रुपये सानुग्रह देण्यासाठी अर्थसहाय्य द्यावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. 

अनेक लहान, मध्यम आणि मोठ्या व्यावसायिकांनी केंद्र सरकारच्या योजनांतून आर्थिक सहाय्य घेतले आहे. लॉकडाऊन काळातील त्यांच्या ओढाताणीचा विचार करुन चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी त्यांना कर्जाच्या हप्त्यांच्या फेडीतून सवलत द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली. मार्च-एप्रिल जीएसटी परताव्याची मुदत आणखी तीन महिने वाढवून मिळावी अशीही मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली. 

मुख्यमंत्र्यांप्रमाणेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे. मागच्यावर्षी देशव्यापी लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारने गरीबांना थेट आर्थिक मदत आणि शिधा दिल्यामुळे राज्यातील लाखो नागरिकांना दिलासा मिळाला. या योजनेला मिळालेल्या यशाचा विचार करुन पुन्हा एकदा राज्याने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या काळातही केंद्राने मदत करावी अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान मोदी यांना केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी