Uddhav Thackeray : ममता बॅनर्जी या वाघीण, त्यांनी एका फटक्यात विरोधकांना उडवून लावले, उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक

राज्यात शिवसेना हा एकमेव लढणार पक्ष आहे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या वाघीण आहेत, त्यांनी एकच पंजा मारला आणि सगळे विरोधक गारद झाले असेही ठाकरे म्हणाले. हिंदूहृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी सवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

थोडं पण कामाचं
  • राज्यात शिवसेना हा एकमेव लढणार पक्ष
  • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या वाघीण
  • त्यांनी एकच पंजा मारला आणि सगळे विरोधक गारद झाले

Uddhav Thackeray : मुंबई : राज्यात शिवसेना हा एकमेव लढणार पक्ष आहे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या वाघीण आहेत, त्यांनी एकच पंजा मारला आणि सगळे विरोधक गारद झाले असेही ठाकरे म्हणाले. हिंदूहृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी सवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना हा लढणारा एकमेव पक्ष आहे, त्याच्याकडे शिवसैनिकांसारखे बळ आहे. असे बळ क्वचितच एखाद्या राजकीय, प्रादेशिक पक्षाकडे आहे. असे बळ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे असल्याचे ठाकरे म्हणाले. त्या वाघीण आहेत. आपण घोषणा देतो, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला. वाघ वाघासारख जगता आले पाहिजे. शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा असे बाळासाहेब म्हणायचे. वाघाला जर डरकाळी फोडता येत नसेल तर त्याने वाघाचे नाव लावू नये, ती बंगालची वाघीण चांगलीच लढली. ममता बॅनर्जी यांनाही विरोधकांनी चहूबाजूंनी घेरले होते, परंतु त्यांनी असा काही फटका मारला की विरोधक नजीकच्या काळात तिथे पीरपीर करायला जातील असे वाटत नाही असेही ठाकरे म्हणाले.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी