अखेर ठरलं, या तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार 

मुंबई
Updated Dec 12, 2019 | 18:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

हिवाळी अधिवेशन झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ डिसेंबर रोजी हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

cm uddhav thackeray cabinet expansion on this date political news in marathi google news
अखेर ठरलं, या तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे आज १५ दिवसांनी खाते वाटप झाले असून आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ डिसेंबर रोजी हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

सध्या ठाकरे सरकारमधील ६ मंत्र्यांकडे ४४ खात्याचे वाटप करण्यात आले आहेत. आता या आधारावर हिवाळी अधिवेशनात प्रश्नोत्तरांना मंत्री सामोरे जाणार आहेत. पण हे अधिवेशन संपल्यावर तात्काळ दुसऱ्या दिवशी मुंबईत मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे माहिती समोर येत आहे. राज भवनावर हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. 

सध्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या प्रत्येकी दोन जणांना मंत्रीपदे वाटप करण्यात आली आहेत. पण काँग्रेसचा विचार केला तर विजय वड्डेटीवार, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांना कोणती मंत्रीपदे मिळणार याकडे सर्वांची लक्ष लागून राहिले आहे. तसेच शिवसेनेचा विचार केला तर गेल्या मंत्रिमंडळात विधान परिषदेतील आमदारांकडे सर्वाधिक मंत्रीपदे होती. त्यात आता नवीन चेहऱ्यांना संधी मिळते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्रीपद आणि इतर मंत्रिपदाची वाटप होणे बाकी आहे. त्यात अजित पवार. दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांना कोणती मंत्रिपदे मिळतात याकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

सध्या तात्पुरते खाते वाटप करण्यात आले असून यात बदल होणार आहे. त्यात अनेक मंत्र्यांचा समावेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, प्रत्येक पक्षाच्या वाट्याला असलेली एक किंवा दोन मंत्रिपदे रिक्त ठेवणार असणार आहेत. आघाडी सरकारच्या काळात असेच करण्यात आले होते. तो फॉर्म्युला यंदाही लागू करणार असल्याचे निश्चित झाले आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  - कोणत्याही मंत्र्याला न मिळालेली खाती 

एकनाथ शिंदे -

 1. गृह मंत्रालय
 2. नगर विकास 
 3. वने
 4. पर्यावरण 
 5. पाणी पुरवठा आणि स्वच्छता 
 6. मृद आणि जलसंधारण
 7. पर्यटन, 
 8. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) 
 9. संसदीय कार्य
 10. माजी सैनिक कल्याण 


छगन भुजबळ 

 1. ग्राम विकास
 2. जलसंपदा व लाभक्षेत्र विकास 
 3. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य 
 4. राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास आणि उद्योजकता
 5. अन्न व औषध प्रशासन 

विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात 

 1. महसूल 
 2. उर्जा व अपारंपारिक उर्जा
 3. वैद्यकीय शिक्षणशालेय शिक्षण,
 4. पशु संवर्धन
 5. दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय 


सुभाष राजाराम देसाई 

 1. उद्योग आणि खनिकर्म
 2. उच्च व तंत्रशिक्षण 
 3. क्रीडा आणि युवक कल्याण 
 4. कृषी
 5. रोजगार हमी योजना
 6. फलोत्पादन
 7. परिवहन
 8. मराठी भाषा 
   

जयंत पाटील 

 1. वित्त आणि नियोजन
 2. गृहनिर्माण
 3. सार्वजनिक आरोग्य 
 4. सहकार व पणन 
 5. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण 
 6. कामगार 
 7. अल्पसंख्यांक विकास 

नितीन राऊत 

 1. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) 
 2. आदिवासी विकास
 3. महिला व बाल विकास 
 4. वस्त्रोद्योग 
 5. मदत व पुनर्वसन
 6. इतर मागासवर्ग 
 7. सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग
 8. विमुक्त जाती
 9. भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी