Uddhav Thackeray : बिनकामाचे भोंगे वाजवणाऱ्यांना मी काडीचीही किंमत देत नाही, राज ठाकरे यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांची टीका

घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच जे लोक बिनकामाचे भोंगे वाजवतात त्यांना मी काडीचीही किंमत देत नाही असे राज ठाकर यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. सोमवारी मुंबईत  बेस्टच्या नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड(एनसीएमसी)चे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

uddhav thackeray
उद्धव ठाकरे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये
  • जे लोक बिनकामाचे भोंगे वाजवतात त्यांना मी काडीचीही किंमत देत नाही
  • जेव्हा बाबरी मश्जीद पाडली गेली तेव्हा हे लोक बिळात घुसले होते.

Uddhav Thackeray :मुंबई : घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच जे लोक बिनकामाचे भोंगे वाजवतात त्यांना मी काडीचीही किंमत देत नाही असे राज ठाकर यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. सोमवारी मुंबईत  बेस्टच्या नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड(एनसीएमसी)चे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आमचे हिंदुत्व हे गदाधारी आहे. घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. जर तुमाला हनुमान चालीसा म्हणायची असेल तर तुमचे स्वागत आहे परंतु जर तुम्ही दादागिरी करणार असाल तर ही दादागिरी कशी मोडून काढायचे हे आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवले असे ठाकरे म्हणाले.  जे लोक बिनकामाचे भोंगे वाजवत आहेत त्यांना मी काडीचीही किंमत देत नाही शी टॆएका राज ठाकरे यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी केली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून भाजपवाले म्हणत आहे की, शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे. हिंदुत्व म्हणजे धोतर आहे का, घालायला आणि सोडायला. जे लोक आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत, त्यांनी हिंदुत्वासाठी काय केले आहे? जेव्हा बाबरी मश्जीद पाडली गेली तेव्हा हे लोक बिळात घुसले होते. राम मंदिराचा निर्यण हा केंद्र सरकारने नव्हे तर कोर्टाने दिला होता. जेव्हा हे मंदिर उभे राहत होते तेव्हा लोक झोळ्या घेऊन बाहेर पडले असेही उद्धव ठाकरे म्हणाले.  
 

आम्ही जे करतो ते ‘बेस्ट’च करतो

आम्ही जे करतो ते ‘बेस्ट’च करतो, आणि यापुढेही ‘बेस्ट’च करत राहू असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच मुंबईत आम्ही सगळ्यांना अभिमान वाटेल, अशी कामं करत आहोत. प्रवास हा विकासाचाही असायला हवा. त्या दृष्टीने आज जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून, मुंबईने करून दाखवलं आहे. लोकांच्या आयुष्यातही ईझ ऑफ लिव्हिंग आणण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  सांगितले.

बेस्टने एनसीएमसी-कार्ड सुविधेच्या माध्यमातून भारतातील कुठल्याही महानगरात नसेल अशी सुविधा उपलब्ध करून दिल्याची अभिमानास्पद कामगिरी केली असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच आज मी येथे बेस्टचं कौतुक करायला आलो आहे. आम्ही सगळ्यांना अभिमान वाटेल, अशी कामे करत आहोत. मी बेस्टच्या आयुष्याचाही प्रवास अनुभवला आहे. बेस्टचे अधिकारी, कर्मचारी नेहमीच पुढे चला.. पुढे चला म्हणूत अथकपणे लोकांच्या सेवेत असतात. कोरोनाच्या संकटातही एस.टी. आणि बेस्टने अलौकीक असे योगदान दिले आहे. माझा उल्लेख लोकप्रिय मुख्यमंत्री असा केला जातो. पण हे बिरुद माझ्या नावासमोर लागण्यासाठी माझ्या या कुटुंबातील तुम्हा सर्वांचे श्रेय आहे. तुम्ही मेहनतीने बेस्टचं, मुंबई महापालिकेच्या कामाचं एक मॉडेल उभे केले आहे. या कामांचे कौतुक उच्च, सर्वोच्च न्यायालय आणि न्यू यार्क टाईम्सनेही केले आहे. या कार्डच्या सुविधेच्या माध्यमातून मुंबईकरांची सुट्ट्या पैश्यांची कटकट दूर केली आहे असेही ठाकरे यांनी यावेळी नमूद केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी