विधानसभेत उद्धव ठाकरे गरजले, भाषणातील १५ महत्त्वाचे मुद्दे 

महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी  विरोधकांचे केल्या हल्ल्यांना उत्तरांनी केली.

CM Uddhav Thackeray full speech today during Maharashtra budget session
विधानसभेत उद्धव ठाकरे गरजले, भाषणातील १५ महत्त्वाचे मुद्दे  

थोडं पण कामाचं

 • महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.
 • आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले.
 • भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी  विरोधकांचे केल्या हल्ल्यांना उत्तरांनी केली.

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी  विरोधकांचे केल्या हल्ल्यांना उत्तरांनी केली.  पहिल्यांदा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना कोपरखळ्या, नंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात उपस्थित केलेल्या मुद्द्यांना तशाच शब्दांत उत्तरे, कोव्हिडच्या काळातली सरकारची कामगिरी अशा मोठ्या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत भाषण केलं. (CM Uddhav Thackeray full speech today during Maharashtra budget session)

पाहू या उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १५ ठळक मुद्दे 

 1. सुधीर मुनगंटीवारांच्या भाषणांनी चंद्रकांतदादांना आणि फडणवीसांना भीती वाटतीय.. आमचं कसं होणार, अशी त्यांच्या मनात भावना आहे. कला जिवंत असली पाहिजे… तिला मरू देऊ नका…
 2. विरोधकांची चर्चा ऐकून नटसम्राट पाहिल्याचा भास… मी आहे अथ्थेला, मी आहे हॅम्लेट…. असे चित्रपटातील संवाद म्हणत म्हणत मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांची खिल्ली उडवली. 
 3. वल्लभाई पटेल यांचं नाव हटवून नरेंद्र मोदींचं नाव त्या स्टेडियमला दिलं आहे. आता त्या स्टेडियमवर भारत प्रत्येक मॅच जिंकणार, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी लगावला.
 4. मराठी ही छत्रपत्रींची भाषा, अभिजात दर्जा द्या म्हणून आम्ही दिल्ली दरबारी जायचं का? मराठी भाषा काय भिकारी आहे का?, असे म्हणून मुख्यमंत्री  ठाकरे चांगलेच भडकले
 5. होय आम्ही औरंगाबादचं संभाजीनगर करणारच, पण तुम्ही सावरकरांना भारतरत्न का देत नाहीत?, मुख्यमंत्र्यांनी असा प्रतिप्रश्न भाजपला केला.
 6. महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण लपवलेला नाही वा मृत्यूही नाही, विरोधकांच्या कोरोनावरच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं उत्तर
 7. बंद दाराआड देखील आम्ही कधी खोटेपणा केलेला नाही, खोटेपणा करणं आमच्या रक्तात नाही
 8. कोव्हिड काळात राज्याला मदत करण्याऐवजी दिल्लीला फंडाचं आवाहन केलं, आणि हिशेब आमच्याकडे मागताय?, दिल्लीच्या पीएम केअर फंडाचा हिशेब कोण देणार
 9. गॅसची हजारी आणि पेट्रोलची शंभरी, इंधन दरवाढीवरुन मुख्यमंत्र्यांचा टोला
 10. शेतकऱ्याच्या मार्गात खिळे आणि चीन दिसले की पळे…. बांगलादेशी पाकिस्तानी सीमारेषा उघड्या.. शेतकरी आंदोलनाला छावणीचं रुप… शेतकरी काय अतिरेकी आहे काय?
 11. हमीभाव नाही तर हमखास भाव देणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
 12. माझं आजोळ माझ्यापासून तोडू नका, विदर्भ वेगळा होणार नाही किंबहुना होऊ देणार नाही
 13. शरजील उस्मानी ही उत्तरप्रदेशची पिल्लावळआहे. त्याला अटक केल्याशिवाय राहणार नाही. विरोधी पक्ष नेते म्हणाले, की त्याला पाताळातूनही शोधून काढू कधी जाताहेत... पाताळात नाही. शरजील 
 14. कोव्हिड काळ असून देखील महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आणलीय, गुजरातमध्ये आली ती शेअरमध्ये गुंतवणूक आली. प्रत्यक्ष गुंतवणूक नाही. महाराष्ट्रात प्रत्यक्ष गुंतवणूक आली आहे. 
 15. जिकडे आम्ही कमी पडलो, तिकडे जरुर सूचना करा पण महाराष्ट्राला बदनाम करु नका. कोविडच्या काळात महाराष्ट्राने केलेल्या कामाचा तरी विरोधी पक्षांनी जाण राखावी. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी