मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील अत्यंत सत्य वाक्य!

वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना उद्देशून विशेष भाषण केले. या भाषणातील वाक्याचा वापर करुन भाजपच्या केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच टोला लगावला.

CM Uddhav Thackeray itself said truth
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील अत्यंत सत्य वाक्य! 

थोडं पण कामाचं

  • मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील अत्यंत सत्य वाक्य!
  • महाराष्ट्रातील जनतेचा आवाज माझ्या पर्यंत पोहोचत नाही, मुख्यमंत्र्यांनी दिली कबुली
  • भाजपच्या केशव उपाध्ये यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला

मुंबईः वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना उद्देशून विशेष भाषण केले. मुंबई, पुण्यासह निवडक जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढत आहेत. या परिस्थितीचा संदर्भ देत लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना प्रश्न विचारला. तुम्हाला लॉकडाऊन हवा की नको, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. या भाषणातील एका वाक्याचा वापर करुन भाजपच्या केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच टोला लगावला. (CM Uddhav Thackeray itself said truth)

मुख्यमंत्र्यांच्याच भाषणाच्या शैलीतील शब्दांचा वापर करत केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील अत्यंत सत्य वाक्य - माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय पण तुमचा आवाज माझ्या पर्यंत येत नाही. हे बरोबर आहे. मुख्यमंत्री घरात बसून आहेत. कोरोना संकट वाढले आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता संकटात आहे ती मदतीचा हात मागते आहे. पण त्यांचा आवाज पोहचत नाही तुमच्या पर्यंत. त्यांना ना मदत ना दिलासा मिळत आहे.' अशा स्वरुपाची टीका भाजपच्या केशव उपाध्ये यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामकाजाच्या शैलीवरच केशव उपाध्ये यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. ही नाराजी त्यांनी ट्वीट करुन जाहीर केली. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला अल्टिमेटम दिले. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना (Coronavirus) बाधितांच्या संख्येत वाढ पहायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे तर वर्धा जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊन सुरू आहे. पुण्यात नाईट कर्फ्यूची घोषणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना अल्टिमेटम दिले. पुढील आठ दिवसांतील परिस्थिती पाहून महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करायचा की नाही या संदर्भातला निर्णय घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी २१ फेब्रुवारी रोजी केली. कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

कोरोना संकट नियंत्रणात येत असल्याचे दिसत होते. जानेवारी महिन्यात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये घट होऊ लागली. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊ लागली. मैदानांमध्ये सुरू केलेली अनेक कोविड केअर सेंटर टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली. मुंबईतले सर्वात मोठे कोविड केअर सेंटरही टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण अचानक परिस्थिती बदलली. फेब्रुवारीच्या १ तारखेपासून हळू हळू रुग्ण वाढू लागले. राज्याची ५० हजारांपेक्षा कमी अॅक्टिव्ह रुग्ण ही स्थिती बदलण्याच चिन्हं दिसू लागली. महाराष्ट्रात २१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळपर्यंत ५२ हजार ९५६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली. कोरोना संकटाची तीव्रता पुन्हा वाढू लागली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाच्या धोक्याचा संदर्भ देत नागरिकांना मास्क वापरा असे आवाहन केले. महाराष्ट्रात आंदोलन, मोर्चा, यात्रा, मिरवणुका यावर बंदी घातल्याचे जाहीर करत मुख्यमंत्र्यांनी 'होय मीच जबाबदार' या नव्या घोषवाक्याची घोषणा केली. मास्क वापरा, सोशल डिस्टंस राखा आणि हात स्वच्छ ठेवण्यासाठी सॅनिटायझर वापरा. जबाबदारीने वागा, अशा स्वरुपाचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी