BMC Whatsapp Chatbot : मुंबई महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 14, 2022 | 16:42 IST

BMC Whatsapp Chatbot or MCGM Whatsapp Chatbot : मुंबई महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. 8999228999 हा नंबर आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह करुन थेट महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’शी व्हॉट्सअपवर संपर्क साधता येईल.

CM Uddhav Thackeray launched BMC Whatsapp Chatbot in Mumbai via VC
मुंबई महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण 
थोडं पण कामाचं
  • मुंबई महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण
  • 8999228999 हा आहे ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’चा नंबर
  • ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’मुळे पालिकेच्या ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या व्हॉट्सअपवर सहज मिळेल

CM Uddhav Thackeray launched BMC Whatsapp Chatbot in Mumbai via VC : मुंबई : मुंबई महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’मुळे पालिकेच्या ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या व्हॉट्सअपवर सहज मिळेल. यासाठी 8999228999 हा नंबर आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह करुन थेट महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’शी व्हॉट्सअपवर संपर्क साधता येईल. मुंबई महापालिकेचा ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे.

‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेच्या लोकार्पणाला वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या  महापौर किशोरी पेडणेकर, मुंबईतील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी व मनपा पदाधिकारी, तसेच महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल,अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे  आणि व्हॉटस् ॲपचे संचालक (सार्वजनिक धोरणे)  शिवनाथ ठुकराल आदी मान्यवर दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळातील महापालिकेच्या कामाचे कौतुक केले. महापालिका तंत्रज्ञानाचा प्रभावीरित्या वापर करत आहे. यापुढेही महापालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करुन जास्तीत जास्त सेवा सोप्या आणि डिजिटल पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करुन द्याव्या; असे मुख्यमंत्री म्हणाले. 

पायाभूत सुविधांच्या विकासाचे काम वेगाने सुरू आहे. मुंबईकरांची ५०० चौ.फुटाच्या घरकुलावरील घरपट्टी माफ केली आहे. कोस्टलरोडचा बोगदा मावळा यंत्राने पूर्ण केला आहे. आता मुंबईकरांना ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’द्वारे अनेक सुविधा सहज उपलब्ध होत आहेत; असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महापालिकेने जनसंपर्क मोहिमेतून पालिकेच्या विविध उपक्रमांची माहिती वेळोवेळी नागरिकांना द्यावी; असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी