मुंबईत लष्कर येणार ही अफवा : उद्धव ठाकरे

मुंबई :  औरंगबादमध्ये झालेल्या घटनेने मी दुःखी झालो आहे. मला खूप त्रास झाला. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाइव्ह मध्ये सांगितले. 

cm uddhav thackeray
Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  

थोडं पण कामाचं

  • मुंबईत लष्कर येणार ही अफवा आहे.
  • औरंगाबादमधील घटनने दुःखी झालो.
  • परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात पाठविण्याची व्यवस्था सुरू आहे.

मुंबई :  औरंगबादमध्ये झालेल्या घटनेने मी दुःखी झालो आहे. मला खूप त्रास झाला. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाइव्ह मध्ये सांगितले. 

पाहा फेसबूक लाइव्ह 

मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रातील जनतेशी संवाद काही ठळक मुद्दे ...

  1. मुंबईत लष्कर येणार ही अफवा, जे करेल ते तुम्हाला सांगून करेल, मुंबईत लष्कराची गरज नाही, ते मुंबईत येणार नाही. 

  2. संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे, सर्व उपाययोजना करत आहोत, 

  3. बीकेसीमध्ये कोव्हिड रुग्णालय उभं राहात आहे, ते दुपटीने वाढवू, आवश्यक त्या सर्व उपाययोजना करु. 

  4. सर्व यंत्रणा तणावाखाली आहेत, पोलीस यंत्रणेतील अनेकजण आजारी पडले, काहींचा मृत्यू झाला, त्यांना विश्रांती देण्याची गरज आहे,

  5. सर्व यंत्रणांवर ताण आहे, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत, त्यांना विश्रांती देण्यासाठी मनुष्यबळ लागलं तर केंद्राकडून मागू, पण त्याचा अर्थ लष्कर बोलवू असं नाही. 

  6. बाहेरच्या राज्यातील आपल्या लोकांना आणणार आहोत, पण सर्व काही मोजून मापून करणार आहोत, 

  7. रेड झोन, कंटेन्मेंट झोनमध्ये अजूनही केसेस सापडत आहेत, तिथे शिथिलता इतक्यात शक्य नाही, लॉकडाऊन हा गतीरोधक आहे, पण चेन तोडायला अद्याप यश नाही. 

  8. लॉकडाऊन कितीवेळा वाढवायचा? आपल्याला चेन तोडण्यात यश आलेलं नाही, ते यश मिळवायचं आहे. 

  9. पोलिसांना विश्रांती देण्यासाठी केंद्राकडून अधिकच्या मनुष्यबळाची मागणी करणार, नंतर पुन्हा टप्प्याटप्प्याने पोलिसांना तैनात करु, याचा अर्थ लष्कर बोलावलं असा नाही. 

  10. मुंबईतील टेस्ट सुरुच राहतील, राज्यात सर्वाधिक टेस्ट होत आहेत, शेवटच्या टप्प्यात रुग्ण आल्यावर उपाय कमी पडतात. 

  11. कोरोनाची साखळी तोडण्याची वेळ आहे, अनेक रुग्ण उशिराने समोर येत आहेत, त्यामुळे सर्दी, खोकला, ताप ही लक्षणं असतील तर स्वतःहून पुढे येऊन तपासणी करा, घाबरु नका. 

  12. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहेच, पण बरे होणाऱ्यांचंही प्रमाण अधिक आहे, सव्वातीन हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले. 

  13. औरंगाबादची दुर्घटना अत्यंत वेदनादायी, मजुरांनी संयम बाळगावा. रुग्णालयांमध्ये गलथानपणा चालणार नाही, आमच्यावर कारवाईची वेळ आणू नका, सर्व व्यवस्थित असताना गलथानपणा चालणार नाही. 

  14. मी आयुष डॉक्टरांनाही आवाहन करतोय, त्यांनी मदतीसाठी पुढे यावं, तुम्हा सर्वांची महाराष्ट्राला गरज आहे. आयुर्वेदीक डॉक्टरांनीही सहभागी व्हावं. 

  15. लॉकडाऊन वाढवण्यात कुणाला रस नाही, पण प्रत्येकाने शिस्त राखणं आवश्यक आहे, माझा प्रत्येक नागरिक हा सैनिक आहे. 

  16. आपल्याला सामाजिक अंतर ठेवायचं नाही, तर शारिरीक अंतर ठेवायचं आहे, म्हणूनच मी फिजीकल डिस्टन्सिंग हा शब्द वापरला 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी