सरकार सणांविरुद्ध नाही तर कोरोनाविरोधात; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबई
भरत जाधव
Updated Aug 31, 2021 | 16:04 IST

हिंदु्च्या सणांवेळीच कोरोना कसा येतो असा प्रश्न करत काल भाजपने मंदिरे उघडण्यासाठी राज्यभरात आंदोलन केले.

cm Uddhav Thackeray replied on Oppositions Protest for dahihandi
सरकार सणांविरुद्ध नाही तर कोरोनाविरोधात : मुख्यमंत्री   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • केंद्राने पत्र पाठवून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी चिंता व्यक्त करत गर्दी होऊ न देण्याचे सांगितले आहे.
  • सध्या शंभर टक्के राजकारण केले जात असल्याने कोरोनाच्या संकटात यात्रा काढल्या जात आहेत - मुख्यमंत्री
  • शिवसेनेची ओळख 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण अशी आहे.

मुंबई : हिंदु्च्या सणांवेळीच कोरोना कसा येतो असा प्रश्न करत काल भाजपने मंदिरे उघडण्यासाठी राज्यभरात आंदोलन केले. तर दहीहंडीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप आक्रमक झाली आहे. तर मनसेने काही निर्बंध झुगारुन दहीहंडी साजरी देखील केली. सणांसाठी सरकारकडून निर्बंधात कुठलीही शिथिलता देण्यात आलेली नाही. आज राज ठाकरेंनी सर्व गोष्टी सुरू असताना सणांवरच बंधन का? असा सवाल केला. यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं. 

कोरोनाला अटकाव घालण्यासाठी नियम पाळावेच लागतील. हे सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे, कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले आहे. केंद्राने देखील या सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.  

पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची मला जाणीव आहे. तो थरार, ते उधाण मला अजूनही आठवते. पण आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे. शिवसेनेची ओळक ही 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण अशी आहे. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे एक वेगळे नाते आहे.  त्यामुळेच शिवसेनेबद्दल लोकांना, ठाणेकरांना वाटणारा विश्वास आजही कायम आहे.

पण दुर्देवाने आज 100 टक्के राजकारण केले जात आहे. कोरोनाचे संकट असतांना आरोग्यविषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत, जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही हे ही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे.दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे. दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी असे राज्याला पत्र पाठवून कळवले आहे. जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे  हे पत्र आपल्याला दाखवायचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी