CM Uddhav Thackeray : आज बीकेसी मैदानात धडाडणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ, भोंगे आणि हनुमान चालीसावर काय देणार उत्तर? संपूर्ण देशाचे लक्ष

मुंबईच्या बीकेसीमध्ये आज शिवसेनेची जाहीर सभा आहे. या सभेला पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. या सभेत उद्धव ठाकरे कुणावर तोफ डागणार, आगामी महानगरपालिका निवडणुकीवर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबईच्या बीकेसीमध्ये आज शिवसेनेची जाहीर सभा आहे. या सभेला पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत.
  • दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत.
  • या सभेत उद्धव ठाकरे कुणावर तोफ डागणार, आगामी महानगरपालिका निवडणुकीवर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

CM Uddhav Thackeray : मुंबई : मुंबईच्या बीकेसीमध्ये आज शिवसेनेची जाहीर सभा आहे. या सभेला पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. या सभेत उद्धव ठाकरे कुणावर तोफ डागणार, आगामी महानगरपालिका निवडणुकीवर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच भोंगा आणि हनुमान चालीसावर उद्धव ठाकरे काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. (CM Uddhav Thackeray shivasena political meeting at bkc mumbai maharashtra politics)

मुंबईच्या बीकेसी मैदानात आज शिवसेनेची जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी साडे ते आठच्या सुमारास उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करतील. या सभेला सुभाष देसाई, दादा भुसे, उदय सामंत तसेच आदित्य ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशीदींवरील भोंग्यावर आक्षेप नोंदवला होता. तसेच हे भोंगे उतरवले नाहीत तर दुप्पट आवाजार हनुमान चालीसा लावू अशी भूमिका घेतली होती. नंतर ठाणे आणि औरंगाबाद सभेतही राज ठाकरे यांनी या भूमिकेचा पुनरुच्चार केला होता. तसेच ३ मे पर्यंत राज ठाकरे यांनी राज्य सरकारला याच अल्टिमेटमही दिला होता. त्यानंतर अनेक ठिकाणी मनसेचे नेते आणि कार्यकर्ते यांची पोलिसांनी धरपकड केली होती. अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते तर काही कार्यकर्त्यांना तडीपारीची नोटीस दिली होती. 

त्यानंतर अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत कौर राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक करून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल केला होता. नंतर काही दिवसांत राणा दाम्पत्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. 

या सगळ्या गदारोळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. तसेच सध्या राज्यात पाणी आणि वीज टंचाई निर्माण झाली आहे. यावर उद्धव ठाकरे भाष्य करणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. तर लवकरच मुंबई, ठाणे, नाशिक आणि नागपूरसह अनेक महानगरपालिका,नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती होणार का? शिवसेना पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार का? याबाबत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी