सरकारला १०० दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री 'या' ठिकाणी भेट देणार 

Maharashtra government 100 days: महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या ठाकरे सरकारला १०० दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री एक महतवपूर्ण  दौरा करणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

cm uddhav thackeray visit ayodhya after completion 100 days maharashtra government in power said sanjay raut shiv sena marathi news
सरकारला १०० दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री 'या' ठिकाणी भेट देणार   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं ट्वीट
  • सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पुर्ण करणारच

मुंबई: अयोध्या श्री राम मंदिर निर्माण प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचं उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं होतं. तसेच आपण लवकरच पुन्हा एकदा अयोध्येला जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली होती. त्यानंतर राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि मुख्यमंत्रिपदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांनी हाती घेतली. आता महाराष्ट्र सरकारला शंभर दिवस होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येचा दौरा करतील अशी माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. अयोध्येला जावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे श्रीरामाचे दर्शन घेतली आणि त्यानंतर पुढील कार्याची दिशा ठरवतील असंही संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, "सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पुर्ण करणारच! प्रभू क्षीरामाची कृपा. सरकारला शंबर दिवस पुणर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येस जातील. श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील".

उद्धव ठाकरे यांनी २०१८ मध्ये अयोध्येचा दौरा केला होता. २४ नोव्हेंबर २०१८ रोजी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अयोध्या दौऱ्यात त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे आणि शेकडो शिवसैनिक सुद्धा उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांचा हा अयोध्या दौरा खूपच चर्चेत राहिला होता. 

शिवसेनेने राज्यात सत्ता स्थापन करताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली. यामुळे शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा बाजुला ठेवला अशी चर्चा सुरु झाली. त्यानंतर २३ जानेवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे हिंदूत्वाचा मुद्दा हाती घेणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्याच दरम्यान आता संजय राऊत यांनी ट्वीट करुन सांगितले की, उद्धव ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहेत. यामुळे शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा अद्याप सोडला नसल्याचं सांगणारा हा एक मेसेज असल्याचं बोललं जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी