लता मंगेशकर पुरस्कार निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्र्यांचं नाव न घेतल्यानं थेट 12 कोटी नागरिकांचा अपमान -जितेंद्र आव्हाड

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 25, 2022 | 10:23 IST

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार (Lata Deenanath Mangeshkar award) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना प्रदान करण्यात आला. पण, या पुरस्कार सोहळ्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi government) नाराजी दिसून येत आहे.

12 crore people insulted by the actions of Mangeshkar family-Awhad
मंगेशकर कुटुंबीयांची कृतीने 12 कोटी माणसांचा अपमान-आव्हाड  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • लता दीदींच्या नावाने पुरस्कार मिळणं हे सौभाग्य आहे. - पंतप्रधान
  • राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती अपमान करणारी आहे. - जितेंद्र आव्हाड
  • पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रदान

मुंबई : मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार (Lata Deenanath Mangeshkar award) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना प्रदान करण्यात आला. पण, या पुरस्कार सोहळ्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi government) नाराजी दिसून येत आहे. या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री (Chief Minister) उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) निमंत्रित करण्यात आले नव्हते. साधं निमंत्रण पत्रिकेतसुद्धा मुख्यमंत्र्यांचं नाव नसल्यानं सरकारमधील नेते कमालीचे नाराज झाले आहेत. 'मंगेशकर कुटुंबियांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे' अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री (Minister of Housing) जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी टीका केली आहे.

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईतील ष्णमुखानंद हॉलमध्ये प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर होते. पण, या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर सुद्धा मुख्यमंत्र्यांचा उल्लेख टाळण्यात आला होता. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त करत ट्विट केलं. 'या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे' अशी टीका आव्हाड यांनी केली.

दरम्यान, या कार्यक्रमाला राज्य सरकारच्या वतीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हजेरी लावली होते. राजशिष्टाचार म्हणून आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई हे मुंबई विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी गेले होते. या कार्यक्रमाला विशेष करून, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सुद्धा उपस्थितीत होते.

पुरस्कार देशातील नागरिकांना समर्पित

दरम्यान,  पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण हा पुरस्कार देशाच्या जनतेला समर्पित करत असल्याचं ते म्हणाले. यावेळी मोदींनी लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी लतादीदी यांच्यासोबत आपली ओळख कधी झाली याबात माहिती दिली. तसेच त्यानंतर आपले मंगेशकर कुटुंबासोबत घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

"चार-साडे चार दशकांपूर्वी ज्येष्ठ दिवंगत संगीतकार आणि गायक सुधीर फडकेंनी आमचा परिचय केला होता. तेव्हापासून आजपर्यंत मंगेशकर परिवारासोबत अपार स्नेह, अगणित घटना माझ्या आयुष्याचा भाग बनले. माझ्यासाठी लतादीदी सूरसम्राज्ञीसह मोठी बहीण होती. मला त्यांच्याकडून नेहमी मोठ्या बहीणीसारखं अपार प्रेम मिळालं आहे. यापेक्षा माझ्या आयुष्यातलं मोठं सौभाग्य काय असू शकतं! आता राखी पौर्णिमेला दीदी राहणार नाहीत. लता दीदींच्या नावाने पुरस्कार मिळणं हे सौभाग्य आहे. हा पुरस्कार स्वीकारणं माझं दायित्व आहे. मी या पुरस्काराला संपूर्ण देशवासींना समर्पित करतो", अशा भावना नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी