CNG Price Hike : सीएनजी, पीएनजीच्या दरात वाढ, मुंबईकरांना बसणार महागाईचा फटका, जाणून घ्या किंमत

सामान्य नागरिकांना महागाईतून दिलासा मिळत नाहिये. पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करून केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला, परंतु आता सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढल्याने पुन्हा महागाईचा भडका उडाला आहे.

CNG
सीएनजी  
थोडं पण कामाचं
  • पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करून केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न
  • आता सीएनजी आणि पीएनजी दर वाढल्याने पुन्हा महागाईचा भडका
  • सीएनजीच्या दरात आतापर्यंत पाचवेळा वाढ

CNG Price Hike : मुंबई : सामान्य नागरिकांना महागाईतून (inflation) दिलासा मिळत नाहिये. पेट्रोल डिझेलच्या (petrol diesel) किंमती कमी करून केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला, परंतु आता सीएनजी (CNG) आणि पीएनजीचे (PNG) दर वाढल्याने पुन्हा महागाईचा भडका उडाला आहे. मुंबईत (Mumbai) सीएनजीची किंमत प्रतिकिलो २ तर पीएनजीची किंमत प्रतियुनिट  दीड रुपयांनी वाढली आहे. 

सीएनजीच्या दरात आतापर्यंत पाचवेळा वाढ करण्यात आली आहे. सीएनजीचे दर आतापर्यंत १६ रुपयांनी वाढवले असून त्याचा फटका टॅक्सी चालकांना, बस, रिक्षा चालक तसेच खासगी कार असलेल्याला ग्राहकांना बसणार आहे. सीएनजी आणि पीएनजीची किंमत वाढल्याने मुंबईत सीएनजी प्रतिकिलो ६३.५० रुपयांना मिळणार आहे. तसेच पीनजी प्रति युनिट ३८ रुपयांना मिळणार आहे.  सीएनजीचे दर वाढल्याने टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी ५ आणि २ रुपयांनी भाडे वाढवण्याची मागणी केली आहे.

देशातील मुख्य शहरांतील सीएनजीचे दर

मुंबई ६३.५० रुपये प्रतिकिलो
गुरुग्राम ६१.१० रुपये प्रतिकिलो
अजमेर ६७.३१  रुपये प्रतिकिलो 
दिल्ली ५३.०४ रुपये प्रतिकिलो
बेंगळुरू ५५ रुपये प्रतिकिलो
कोलकाता ३७.७१ रुपये प्रतिकिलो
चेन्नई ३५.४४ रुपये प्रतिकिलो

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी