CNG Price Hike : मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत वाढ, सर्वसामान्यांवर वाढणार महागाईचा बोझा

मुंबईत पुन्हा सीएनजी आणि पीएएनजीचे दर वाढले आहेत. गेल्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले होते. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात पेट्रोल डिझेलचे दर कमी केले होते. परंतु आता मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत वाढ झाली आहे. एका महिन्यात ही दुसर्‍यांदा केलेली दरवाढ आहे. 

CNG gas price hiked
सीएनजीच्या किंमतीत वाढ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबईत पुन्हा सीएनजी आणि पीएएनजीचे दर वाढले आहेत.
  • गेल्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले होते.
  • एका महिन्यात ही दुसर्‍यांदा केलेली दरवाढ आहे.

CNG Price Increased: मुंबईत (Mumbai) पुन्हा सीएनजी आणि पीएनजीचे (CNG & PNG) दर वाढले आहेत. गेल्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलचे (Petrol Diesel) दर गगनाला भिडले होते. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात पेट्रोल डिझेलचे दर कमी केले होते. परंतु आता मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत वाढ झाली आहे. एका महिन्यात ही दुसर्‍यांदा केलेली दरवाढ आहे. (cng and png price hiked in mumbai travel may get costly after price hiked)

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! CNG ६ रुपयांनी तर PNG ३.५० रुपयांनी स्वस्त

मुंबई शहरात गॅस वितरक महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या किंमतीत सहा रुपये प्रतिकिलो वाढ केली आहे. तर पीएनजीच्या दरांत चार रुपये प्रतियुनिट वाढ केली आहे. पेट्रोल डिझेलच्या तुलनेत सीएनजी आणि पीएनजी स्वस्त असतं म्हणून साधारण ग्राहकांचा ओढा सीएनजीवर चालणार्‍या गाड्यांकडे आहे. आता त्यातही दरवाढ झाल्याने ग्राहकांची पंचाईत होत आहे. 

CNG Car Sale Drops : सीएनजी गाड्यांच्या विक्रीत 12 टक्क्यांची घट, कारण 2 महिन्यांत 18 रुपये किलो महाग झाला सीएनजी...

एप्रिल नंतर सहाव्यांदा दरवाढ

आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि घरगुती स्तरावर सीएनजीची किंमत वाढल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यानंतर ही झालेली दरवाढ सहावी आहे. 

CNG Price Update : सीएनजी झाला महाग, पाहा आज पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले की महाग?


म्हणून दरवाढ

महानगर गॅस लिमिटेडने जारी केलेल्या पत्रकानुसार गॅसपुरवठ्यात कमतरता निर्माण झाली आहे. ही कमतरता भरू काढण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे. तसेच रुपया घसरल्यानेही ही दरवाढ केल्याचे महानगर गॅसने म्हटले आहे. सध्या मुंबईत सीएनजी प्रति किलोची किंमत ८६ रुपये इतकी होती तर पीएनजीची प्रति युनिट किंमत ५२.५० इतकी आहे. यापूर्वी सीएनजीची किंमत प्रति किलो ८० रुपये तर पीएनजीची किंमत ४८.५० रुपये इतकी होती. 

मुंबई आणि MMR मध्ये CNG ७६ रुपये किलो तर PNG ४५.५०

सीएनजीच्या किंमतीत सतत वाढ

देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमती गेल्या ७३ दिवसांपासून स्थिर आहे. असे असले तरी सीएनजीच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. सीएनजीची ही झालेली दरवाढ गेल्या १३ महिन्यातील ११ वी दरवाढ आहे. गेल्या वर्षभरात सीएनजीच्या दरात ३६ रुपयांनी वाढ झाली आहे. 

CNG Price Hike : नागरिकांनो खिश्याचा अंदाज घेऊन वाहने घराबाहेर काढा! पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG-PNG ची दरवाढ


प्रवास महागणार

सीएनजीचे दर वाढल्याने त्याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. कारण टॅक्सी, रिक्शा युनियन दरवाढ करण्याची मागणी करत आहेत. मुंबईत ८ हजार शाळेच्या बसेस आहेत. यातल्या बहुतांश बसेस या सीएनजीवर चालणार्‍या आहेत. बेस्टच्या २१०० गाद्या सीएनजीवर धावतात असे असले तरी त्यांचे किमान भाडे पाच रुपये इतके आहे. तसेस मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात टॅक्सी आणि रिक्शाही मोठ्या प्रमाणात सीनजीवर चालतात, त्यांनीही इंधनाच्या किंमती वाढत असल्याने दरवाढ करण्याची मागणी केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी