Anandrao Adsul : आनंदराव अडसूळांच्या अटकपूर्व जामिनावर २५ जानेवारीला सुनावणी

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 07, 2022 | 06:14 IST

Co-operative bank fraud case: Shiv Sena leader Anandrao Adsul's pre-arrest bail hearing on 25 January 2022 : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २५ जानेवारी २०२२ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

Co-operative bank fraud case: Shiv Sena leader Anandrao Adsul's pre-arrest bail hearing on 25 January 2022
आनंदराव अडसूळांच्या अटकपूर्व जामिनावर २५ जानेवारीला सुनावणी 
थोडं पण कामाचं
  • आनंदराव अडसूळांच्या अटकपूर्व जामिनावर २५ जानेवारीला सुनावणी
  • मुंबईच्या सत्र न्यायालयात होईल सुनावणी
  • जामीन मिळाल्यास अडसूळांना दिलासा मिळेल पण अर्ज फेटाळला गेला तर त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Co-operative bank fraud case: Shiv Sena leader Anandrao Adsul's pre-arrest bail hearing on 25 January 2022 : मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २५ जानेवारी २०२२ रोजी पुढील सुनावणी होणार आहे. इडीने (Enforcement Directorate - ED) अडसूळांवर मनी लाँड्रिंगचा अर्थात पैशांची अफरातफर केल्याचा आरोप केला आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयात (Sessions Court) अडसूळांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होईल. याआधी न्यायालयाने अडसूळांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे अडसूळांकडून पुन्हा एकदा जामीन मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावेळी जामीन मिळाल्यास अडसूळांना दिलासा मिळेल पण अर्ज फेटाळला गेला तर त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

अडसूळांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी आधी थेट मुंबईच्या उच्च न्यायालयात (High Court) अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयात दाद मागा असे सांगितल्यानंतर अडसूळांनी सत्र न्यायालयाकडे अर्ज केला. त्यांचा पहिला अर्ज सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाचे न्यायाधीश एस. एच. सातभाई यांनी फेटाळला होता. नव्या अर्जावरील सुनावणी २५ जानेवारी रोजी होणार आहे. ही सुनावणी होईपर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामीन द्यावी अशी अडसूळांनी केलेली मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.

सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेतील ९८० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी इडीने आनंदराव अडसूळ आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ या दोघांवर मनी लाँड्रिंगचा आरोप ठेवला आहे. चौकशीसाठी इडीने मुंबई आणि अमरावतीत अडसूळांशी संबंधित कार्यालयांवर आणि घरांवर धाड टाकली. यानंतर इडीने समन्स बजावले. अडसूळांचे अटकपूर्व जामीन मिळविण्याचे प्रयत्न उच्च न्यायालयात अयशस्वी झाले. इडीचे पथक २७ सप्टेंबर २०२१ रोजी थेट अडसूळांच्या घरी पोहोचले. चौकशी सुरू असताना तब्येत ढासळल्यामुळे अडसूळांना गोरेगावच्या लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

अडसूळांच्या विरोधात आमदार रवी राणा यांनी तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीआधारे तपास सुरू आहे. 

कोण आहेत आनंदराव अडसूळ?

  1. आनंदराव अडसूळ हे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार
  2. १९९६ पासून पाच वेळा खासदार
  3. शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अडसूळांचा समावेश
  4. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांनी केला अडसूळांचा पराभव

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी