कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चितीसाठी समिती 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सिटीस्कॅनचे दर निश्चित करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती स्थापन झाली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चितीसाठी समिती 
committee form for ct scan rate in background of covid19 pandemic   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • आठवडाभरात अहवाल सादर होणार
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.
  • सात दिवसात समिती अहवाल सादर करेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मुंबई  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. सात दिवसात समिती अहवाल सादर करेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास यांच्या स्वाक्षरीने शासन निर्णय देखील आज निर्गमित करण्यात आला आहे. यापूर्वीदेखील कोरोना आणि इतर रुग्णांच्या तपासणीसाठी खासगी रुग्णालयांनी आकारावयाचे दर तसेच खासगी प्रयोगशाळांनी आरटीपीसीआर, रॅपीड ॲण्टी जेन, ॲण्टीबॉडी चाचण्यांसाठीचे दर निश्चित केले आहे.

कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी सिटीस्कॅन सारख्या चाचणीची देखील आवश्यकता भासते. त्यासाठी खासगी रुग्णालये किंवा सिटीस्कॅन सुविधा असलेल्या केंद्रांकडून अवाजवी रक्कम आकारण्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यासाठी एचआरसीटी चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

डॉ.शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत एलटी वैद्यकीय महाविद्यालय आणि सायन रुग्णालयाच्या रेडीऑलॉजी विभाग प्रमुख डॉ.अनघा जोशी, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता हे सदस्य असून संचालक आरोग्य समितीचे सदस्य सचिव आहेत. ही समिती एचआरसीटी चाचणीच्या दर निश्चितीसाठी खासगी रुग्णालये व एचआरसीटी चाचणी केंद्रांशी चर्चा करुन सात दिवसात शासनाला अहवाल सादर करतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी