सर्वसामान्यांच्या पोटाचा आधार असणाऱ्या वडापावचा भाव वाढला

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 03, 2022 | 08:21 IST

पाव महागण्याची शक्यता असल्याने वडापाव, पावभाजी खाताना खिशाला फोडणी आणि आपल्या हिशोबाला ठसका बसणार आहे. या दरवाढीमुळे साधारणपणे 14 ते 15 रुपयांना मिळत असलेला वडापाव आता 18 ते 20 रुपयांना मिळेल.  तर साधे वडापाव विक्रेतेदेखील आपल्याकडील 12 रुपयांना देण्यात येणारा वडापावचा भाव वाढवत 14 ते 15 रुपये करतील. 

vada pav price increased
वडापावचा वाढणार भाव; सर्वसामान्यांचा हिशोब होणार तिखट   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मागील वर्षापर्यंत पावासाठीच्या मैद्याचे 50 किलोचे पोते 1200 ते 1400 रुपयांना मिळत होते.
  • 14 ते 15 रुपयांना मिळत असलेला वडापाव आता 18 ते 20 रुपयांना मिळेल.
  • पावाच्या भट्टीसाठी लागणारे अन्य सामानदेखील महागले आहे.

मुंबई : मुंबईचा(Mumbai) वडापाव (Vada pav) हा जगप्रसिद्ध आहे. सकाळी लवकर घराबाहेर पडणारे, हातावर पोट असलेले अनेक चाकरमान्यांना (servants) पोटभरण्यासाठी कित्येकदा वडापावचाच आधार घेत असतात. परंतु  भुकेच्या वेळी पोटाला आधार देणारा हा आवडता वडापाव लवकरच महागणार आहे. पावाच्या दरात वाढ झाल्याने वडापावसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. पावचे दरही वाढलेत याचे कारण म्हणजे पाव बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल महागला असं पाव उत्पादकांकडून सांगण्यात येत आहे.  (common man's one time food vada pav price increased )

अधिक वाचा  : 509 दिवसांपासून सुरु असलेल्या पिकविम्याच्या लढाईला यश

पाव महागण्याची शक्यता असल्याने वडापाव, पावभाजी खाताना खिशाला फोडणी आणि आपल्या हिशोबाला ठसका बसणार आहे. या दरवाढीमुळे साधारणपणे 14 ते 15 रुपयांना मिळत असलेला वडापाव आता 18 ते 20 रुपयांना मिळेल.  तर साधे वडापाव विक्रेतेदेखील आपल्याकडील 12 रुपयांना देण्यात येणारा वडापावचा भाव वाढवत 14 ते 15 रुपये करतील. 

‘मागील वर्षापर्यंत पावासाठीच्या मैद्याचे 50 किलोचे पोते 1200 ते 1400 रुपयांना मिळत होते. त्याचा दर आता 1600 रुपयांच्या घरात गेला आहे. पावाच्या भट्टीसाठी लागणारे अन्य सामानदेखील महागले आहे. डिझेल दरवाढीमुळे वाहतूक महागली आहे. यामुळे पाव उत्पादन ते विक्री, या खर्चात जवळपास निम्म्याने वाढ झाली आहे, असं पाव उत्पादक संघटनेशी संलग्नित असलेले पाव पुरवठादार निलेश मोरे यांनी सांगितले.  

अधिक वाचा  : suryakumar yadav: सूर्याची मोठी झेप, मिळवले हे स्थान

मुंबईत माहिम, वांद्रे, लोअर परळ, विलेपार्ले, अंधेरी या भागात पावांचे उत्पादन होत असते. या भागात स्वत: पाव तयार करुन विक्री करणाऱ्यांकडील पावाचा दर आतापर्यंत साधारण 2 रुपये प्रति पाव असा होता. त्यात उत्पादन खर्च दीड रुपया होता. आता मात्र उत्पादन खर्चच प्रति पाव 2 रुपयांच्या घरात गेला आहे. त्यामुळे त्यांनी पावाची किंमत आता 3 रुपयांपर्यंत वाढू शकते. आधी 12 रुपयांना मिळणारी सहा पावांची लादी आता 16 रुपयांना मिळत आहे. याचदरम्यान काही मोठे उत्पादक आतापर्यंत 6 पावांच्या लादीची 18 ते 20 रुपयांना विक्री करीत होते. हे विक्रेते आता तो दर 22 ते 24 रुपये करतील. 

‘पाव महागल्याने साधारणपणे १४ ते १५ रुपयांना मिळत असलेला दुकानांतील वडापाव आता १८ ते २० रुपये होत आहे. साधे वडापावविक्रेतेदेखील साधारण १२ रुपयांचा वडापाव १४ ते १५ रुपये किंमतीला विकण्यास सज्ज आहेत’, असे दादर परिसरातील वडापावचे दुकानदार अमित मदने यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी