MBBS विद्यार्थ्यांना सरकारी वैद्यकीय  सेवेसाठी काम करणे बंधनकारक

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 15, 2022 | 09:44 IST

compulsory to work in government hospital or government medical clinic after completing mbbs in maharashtra : महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण घेतेलेल्या अर्थात एमबीबीएस केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारी रुग्णालय किंवा सरकारी आरोग्य केंद्र या ठिकाणी काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

compulsory to work in government hospital or government medical clinic after completing mbbs in maharashtra
MBBS विद्यार्थ्यांना सरकारी वैद्यकीय  सेवेसाठी काम करणे बंधनकारक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात MBBS केलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी वैद्यकीय  सेवेसाठी काम करणे बंधनकारक
  • आधी बंधनातून मुक्त होण्यासाठी विद्यार्थी दंड भरू शकत होते
  • आता दंडाचा पर्याय रद्द केला

compulsory to work in government hospital or government medical clinic after completing mbbs in maharashtra : महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण घेतेलेल्या अर्थात एमबीबीएस केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारी रुग्णालय किंवा सरकारी आरोग्य केंद्र या ठिकाणी काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याआधी अशा स्वरुपाच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी विद्यार्थी दंड भरू शकत होते. आता ही सवलत काढून टाकण्यात आली आहे. यामुळे एमबीबीएस केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारी रुग्णालय किंवा सरकारी आरोग्य केंद्र या ठिकाणी काम करण्याचे बंधन आहे. 

शासन निर्णय : राज्यातील एम.बी.बी.एस. अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सामाजिक दायित्व सेवा अनिवार्य करण्याबाबत

आधीच्या निर्णयानुसार २००४ ते २००७-२००८ या सत्रात अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना सरकारी सेवा न करण्याचा पर्याय उपलब्ध होता. यासाठी त्यांना पाच लाख रुपयांचा दंड आकारला जात होता. नंतर २००८-२००९ पासून एमबीबीएस केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारी सेवा करायची नसल्यास दहा लाख रुपयांचा दंड भरण्याचे बंधन घालण्यात आले. पण महाराष्ट्र शासनाच्या नव्या निर्णयानुसार आता एमबीबीएस केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारी सेवा करणे सक्तीचे आहे. दंड भरून सरकारी सेवा टाळण्याचा पर्याय विद्यार्थ्यांकडे उपलब्ध नसेल. 

कोरोना संकटामुळे सरकारी हॉस्पिटल, औषधे आणि डॉक्टर यांची आवश्यकता वाढली आहे. यामुळेच महाराष्ट्र शासनाने एमबीबीएस केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारी सेवेत काम करण्याचे बंधन लागू केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात १८ हजार २६७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी ११ हजार ८१३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईत आहेत. यामुळेच महाराष्ट्र शासनाने एमबीबीएस केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारी सेवेत काम करण्याचे बंधन लागू केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी