महाराष्ट्रात सोमवारपासून अनलॉक सुरू, आदेश दिला

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 05, 2021 | 11:12 IST

महाराष्ट्रात सोमवार ७ जून २०२१ पासून अनलॉकची प्रक्रिया सुरू होईल. या संदर्भात राज्य शासनाने आवश्यक आदेश दिले.

conditional unlock in maharashtra
महाराष्ट्रात सोमवारपासून अनलॉक सुरू, आदेश दिला 

थोडं पण कामाचं

 • महाराष्ट्रात सोमवारपासून अनलॉक सुरू, आदेश दिला
 • महाराष्ट्रात सोमवार ७ जून २०२१ पासून अनलॉकची प्रक्रिया सुरू
 • पॉझिटिव्हिटी रेट आणि भरलेल्या ऑक्सिजनची बेडची संख्या याआधारे अनलॉकचे नियम लागू होणार

मुंबईः महाराष्ट्रात सोमवार ७ जून २०२१ पासून अनलॉकची प्रक्रिया सुरू होईल. या संदर्भात राज्य शासनाने आवश्यक आदेश दिले. आदेशानुसार राज्याची पाच गटांत विभागणी होईल. कोरोनो पॉझिटिव्हिटी रेट आणि भरलेल्या ऑक्सिजनची बेडची संख्या यांचा आढावा घेऊन प्रत्येक शहर अथवा जिल्ह्याला पाच पैकी योग्य त्या गटात समाविष्ट केले जाईल. दर आठवड्याला कोरोनो पॉझिटिव्हिटी रेट आणि भरलेल्या ऑक्सिजनची बेडची संख्या यांचा आढावा घेऊन निर्णयाची समीक्षा स्थानिक पातळीवर केली जाईल. conditional unlock in maharashtra

 1. पहिला गट - कोरोनो पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के, २५ टक्क्यांपेक्षा कमी  ऑक्सिजन बेड भरले आहेत
 2. दुसरा गट - कोरोनो पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के, ४० टक्क्यांपेक्षा कमी  ऑक्सिजन बेड भरले आहेत
 3. तिसरा गट - कोरोनो पॉझिटिव्हिटी रेट ५ ते १० टक्के, ४० टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड भरले आहेत
 4. चौथा गट - कोरोनो पॉझिटिव्हिटी रेट १० ते २० टक्के, ६० टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड भरले आहेत
 5. पाचवा गट - कोरोनो पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांपेक्षा जास्त, ७५ टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड भरले आहेत

काय सुरू आणि काय बंद?

 1. पहिला गट - मास्कसक्ती लागू आणि सोशल डिस्टंस राखा. १०० टक्के अनलॉक. रेल्वे, बससह सर्व प्रकारची वाहतूक सामान्यांसाठी सुरू. सर्व दुकानं आणि व्यवसाय सुरू. 
 2. दुसरा गट - मास्कसक्ती लागू आणि सोशल डिस्टंस राखा. दुकानं, मॉल सुरू. हॉटेल आणि रेस्टॉरंट तसेच नाट्यगृह आणि सिनेमागृह येथे ५० टक्के लोकांना परवानगी. खेळाची मैदाने सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ सुरू राहतील. शूटिंग सुरू. लग्नासाठी आसन क्षमतेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १०० जणांच्या उपस्थितीला परवानगी. अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्यांसाठी संख्येचे बंधन नाही. निवडणूक, बैठकांवर निर्बंध नाही. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना ५० टक्के क्षमतेने परवानगी. सार्वजनिक वाहतूक सेवा १०० टक्के क्षमतेने सुरू होईल. आसन क्षमतेइतकेच प्रवासी प्रवास करू शकतील. या भागात जमावबंदी लागू असेल.
 3. तिसरा गट - मास्कसक्ती लागू आणि सोशल डिस्टंस राखा. अत्यावश्यक दुकानं संध्याकाळी ४ पर्यंत आणि इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ पर्यंत सुरू राहणार.
 4. चौथा गट - मास्कसक्ती लागू आणि सोशल डिस्टंस राखा. अत्यावश्यक दुकानं संध्याकाळी ४ पर्यंत सुरू. इतर दुकानं बंद. 
 5. पाचवा गट - मास्कसक्ती लागू आणि सोशल डिस्टंस राखा. अत्यावश्यक दुकानं संध्याकाळी ४ पर्यंत सुरू. इतर दुकानं बंद.

तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या गटासाठी कोरोना प्रोटोकॉलचे इतर निर्बंध कायम राहतील.

कोणत्या गटात कोणता जिल्हा?

पहिल्या गटातील जिल्हे – अहमदनगर, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, ठाणे, वर्धा.

दुसऱ्या गटातील जिल्हे – औरंगाबाद, गडचिरोली, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी.

तिसऱ्या गटातील जिल्हे – अकोला, अमरावती, बीड, वाशिम, यवतमाळ.

चौथ्या गटातील जिल्हे – पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी