'... तर शिवसेना एनडीएतून बाहेर पडेल'

मुंबई
सुनिल देसले
Updated Nov 06, 2019 | 16:54 IST

Husain Dalwai - Sanjay Raut meeting: राज्यात सत्ता स्थापनेवरुन सुरु असलेल्या संघर्षात दररोज नवनव्या घटना घडताना दिसत आहे. काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेत एक मोठं वक्तव्य केल

congress leader husain dalwai shiv sena sanjay raut bjp government maharashtra politics news marathi
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • हुसेन दलवाई यांनी घेतली संजय राऊत यांची भेट
  • भेटीनंतर हुसेन दलवाई यांनी केलं मोठं वक्तव्य 
  • राज्यात भाजपचं सरकार येणार नाही - दलवाई 
  • हुसेन दलवाई यांच्या वक्तव्याने विविध चर्चांना उधाण

मुंबई: राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात रस्सीखेच सुरु असतानाच दररोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर दुपारी काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर हुसेन दलवाई यांनी राज्यात भाजपचं सरकार येणार नाही असं सांगितलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. पाहूयात हुसेन दलवाई यांनी संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर काय म्हटलं. 

भाजपचं राजकारण घातक 

राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या संदर्भात ज्या काही धमक्या दिल्या जात आहेत ते चुकीचं आहे. राज्याची परंपरा आहे की, राज्यात विरोधी पक्षांना चांगलं वागवलं जातं. आत्ताचं राजकरण वेगळ्या पद्धतीने सुरु आहे. आमच्या सोबत या अन्यथा अमूक करु तमूक करु अशी दमबाजी केली जात आहे हे अत्यंत चुकीचं आहे. भाजप नेते दमबाजी करत आहेत. भाजपचा मुख्यमंत्री होऊ नये ही आमची इच्छा आहे. भाजपचं राजकारण अत्यंत घातक आहे. महाराष्ट्राचा विकास करणं आवश्यक आहे.

तर शिवसेना एनडीएतून बाहेर पडेल

समजूतीने पाठिंबा देण्याच्या गोष्टी घडत असतात. जर निर्णय होत असेल तर शिवसेना एनडीएतून बाहेर पडेलच असंही हुसेन दलवाई यांनी म्हटलं आहे. 

महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नकोच

महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर चर्चा करणं हे चुकीचं नाहीये. संजय राऊत हे माझे मित्रही आहेत. एनसीपी-काँग्रेसची भूमिका आहे की भाजपचा मुख्यमंत्री बनता कामा नये. महाराष्ट्राला मागे टाकण्याचं काम भाजपने केलं आहे. भाजपचा मुख्यमंत्री होऊ नये असं माझं ठाम मतं आहे. भाजपचा मुख्यमंत्री बनू नये म्हणून शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा. 

भाजपला सत्ता स्थापनेचा नैतिक अधिकार नाही

राज्यात राष्ट्रपती लागवट लागू देणार नाही ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका आहे. भाजपला सत्ता बनवण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाहीये. भाजपपेक्षा शिवसेना नक्कीच चांगली आहे. भाजप आणि आरएसएसने नेहमीच धर्मांत फूट पाडण्याचं काम केलं आहे. भाजपचं हिंदुत्व आणि शिवसेनेचा हिदुत्वाचा मुद्दा यात जमीन आसमानचा फरक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी