President Election 2022 : राष्ट्रपती पदासाठी जर शरद पवारांचे नाव पुढे येत असेल तर.. नाना पटोलेंचं मोठ वक्तव्य

congress leader nana patole support ncp chief sharad pawar presidential candidature : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या राजकीय गुगलीची भल्याभल्या राजकीय उस्तादांना उकल होत नाही. शरद पवार यांच्या राजकीय सामाजिक वावराला किमान ५० वर्षाहून अधिक काळ पूर्ण झाला आहे. पण त्यांना पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपदाने कायम हुलकावणी दिली आहे. पवारांनी अनेक राजकीय नेते घडविले, अनेक पद भोगली. केंद्रीय मंत्री देखील राहिलेल्या पवारांना मात्र, राष्ट्रपती पदाच्या खुर्चीत बसण्याचा मान त्यांना मिळाला नाही

congress leader nana patole support ncp chief sharad pawar presidential candidature
शरद पवारांच्या राष्ट्रपती पदावरून नाना पटोलेंच मोठ वक्तव्य   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्राची व्यक्ती देशाची राष्ट्रपती होत असेल तर याचा मला आनंदच होईल - नाना पटोले
  • पवारांना पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपदाने कायम हुलकावणी दिली आहे
  • राष्ट्रपतीपदाची १८ जुलैला मतदान पार पडेल, तर २१ जुलैपर्यंत नव्या राष्ट्रपतींची निवड प्रक्रिया पूर्ण होईल

President Election 2022 : मुंबई : नाना पटोले यांनी एक ट्विट करत मोठ वक्तव्य केलं आहे. 'महाराष्ट्राची व्यक्ती देशाची राष्ट्रपती होत असेल तर याचा मला आनंदच होईल. शरद पवारांकडे राष्ट्रपतीपद येणार असेल तर काँग्रेसचा त्याना माझा पूर्ण पाठिंबा असेल', असं ट्विट नाना पटोलेंनी केलं आहे. अनेक वर्षापासून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसोबत एक मुद्दा वारंवार चर्चिला जातो, तो म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) अन् राष्ट्रपतीपद.

अधिक वाचा : सत्य समोर येण्यासाठीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता - राठोड

राष्ट्रपतीपदाची १८ जुलैला मतदान 

यावेळी आपल्या राज्यातील राष्ट्रपती व्हावा यासाठी अनेक राज्यातील नेते उत्सुक आहेत. त्याचबरोबर आता पवारांनी राष्ट्रपती व्हावं, यासाठी महाराष्ट्र काँग्रेस आग्रही आहे. त्यामुळे पवार राष्ट्रपती व्हावे यासाठी नाना पटोलेंनी तसं ट्विट देखील केलं आहे. दरम्यान, राज्यसभेची रणधुमाळी नुकतीच पार पडली. तसाच देशातील अनेक निवडणुका पार पडत असल्याने सध्या देशात निवडणुकांचं वारं वाहत आहे. तर ८ दिवसांवर विधान परिषदेची निवडणूक आहे. तर १८ जुलैला मतदान पार पडेल. तर २१ जुलैपर्यंत नव्या राष्ट्रपतींची निवड प्रक्रिया पूर्ण होईल.

अधिक  वाचा : ट्रॅफिक कॉन्स्टेबल तुमच्या गाडीची चावी काढू शकत नाही... 

पवारांना हुलकावणी दिली आहे

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या राजकीय गुगलीची भल्याभल्या राजकीय उस्तादांना उकल होत नाही. शरद पवार यांच्या राजकीय सामाजिक वावराला किमान ५० वर्षाहून अधिक काळ पूर्ण झाला आहे. पण त्यांना पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपदाने कायम हुलकावणी दिली आहे. पवारांनी अनेक राजकीय नेते घडविले, अनेक पद भोगली. केंद्रीय मंत्री देखील राहिलेल्या पवारांना मात्र, राष्ट्रपती पदाच्या खुर्चीत बसण्याचा मान त्यांना मिळाला नाही. त्याचवेळी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पवारांचं नाव पुढे केलं आहे. त्यामुळे पवारांच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा होऊ लागली आहे. दरम्यान, पवार राष्ट्रपती व्हावे यासाठी अनेक राजकीय नेते एकत्र देखील येत असल्याची चर्चा आहे.

अधिक वाचा : लोकलनं प्रवास करत ३ बहिणी डोंबिवलीत करायच्या चोऱ्या

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी