'सावरकरांना भारतरत्न देण्यास काँग्रेसचा पाठिंबा नाही, सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराजांना भारतरत्न द्यावा'

Bharat Ratna: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत भाष्य केलं. त्यानंतर आता यावरुन महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Nana Patole
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यास काँग्रेसचा पाठिंबा नाही - नाना पटोले
  • सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराजांना भारतरत्न मिळावा - नाना पटोले

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना (Swatantryaveer Savarkar) भारतरत्न (Bharat Ratna) देण्यावर विधानसभेत भाष्य करत समर्थन दिलं आणि त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात विविध चर्चा सुरू झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीला समर्थन दिल्याने सत्ताधारी काँग्रेसचा (Congress) सुद्धा याला पाठिंबा आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला. यावर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाष्य करत म्हटलं, सावरकरांना भारतरत्न देण्यास काँग्रेसचा पाठिंबा नाही.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं, "सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेबाबत आमचे एकमत नाहीये. ती शिवसेनेची भूमिका आहे. आमची भूमिका आहे की, सावित्रीबाई फुले (Savitribai Phule), महात्मा ज्योतीबा फुले (Mahatma Jyotiba Phule) आणि शाहू महाराजांना (Shahuji Maharaj) भारतरत्न मिळावा असी आहे. भारतरत्न देण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे राज्य सरकारचा नाही."

काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (३ मार्च २०२१) विधानसभेत म्हटलं होतं, "स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या असे पत्र दोन वेळा दिले गेलं होतं. देवेंद्रजी आपण त्यावेळी मुख्यमंत्री होता. पहिलं पत्र २०/०८/२०१८ आणि दुसरं पत्र १७/०१/२०१९ या तारखेला पाठवलं होतं. कोण देतं हो भारतरत्न? आपली आमदारांची कमिटी आहे का? भारतरत्न देण्यासाठी आमदारांची कमिटी तयार करायची का? भारतरत्न देण्याचा अधिकार हा पंतप्रधान आणि केंद्रीय समितीला आहे. पण का नाही दिलं जात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न?" सावरकरांना भारतरत्न देत नाही आणि आम्हाला सांगता संभाजीनगर करा. आम्ही करु ना जरुर संभाजीनगर करु.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी