निवडणुकीसाठी मुंबई मनपाच्या मतदारसंघांची रचना नव्याने होणार?

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 14, 2022 | 12:38 IST

Constituencies of Mumbai Municipal Corporation will be restructured for elections? : निवडणुकीसाठी मुंबई मनपाच्या मतदारसंघांची रचना नव्याने होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी मुंबई मनपाच्या मतदारसंघांची नव्याने रचना करण्याची मागणी केली आहे.

Constituencies of Mumbai Municipal Corporation will be restructured for elections?
निवडणुकीसाठी मुंबई मनपाच्या मतदारसंघांची रचना नव्याने होणार?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • निवडणुकीसाठी मुंबई मनपाच्या मतदारसंघांची रचना नव्याने होणार?
  • काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी केली मागणी
  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद

Constituencies of Mumbai Municipal Corporation will be restructured for elections? : निवडणुकीसाठी मुंबई मनपाच्या मतदारसंघांची रचना नव्याने होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी मुंबई मनपाच्या मतदारसंघांची नव्याने रचना करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे मिलिंद देवरा यांनी मागणी करण्यासाठी केलेल्या ट्वीटला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई महानगरपालिका या तीन ट्विटर हँडलना टॅग करून ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेले पत्र दिसत आहे. महाविकास आघाडी सरकार असताना मुंबईत मनपाच्या मतदारसंघांची नव्याने रचना झाली. ही रचना करताना काँग्रेस पक्षाचे नुकसान व्हावे आणि फक्त एकाच पक्षाला फायदा व्हावा या उद्देशाने खबरदारी घेण्यात आली, असा आरोप मिलिंद देवरा यांनी केला आहे. देवरा यांनी पत्रात नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे बोट दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

पक्षपात झाल्याचा आरोप करून मिलिंद देवरा यांनी पुन्हा एकदा मतदारसंघांची रचना करण्याची मागणी केली आहे. मिलिंद देवरा यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिलिंद देवरा यांच्या ट्वीटला प्रतिक्रिया देताना 'आपण व्यक्त केलेल्या भावनांची योग्य दखल घेतली जाईल तसेच आपण निष्पक्ष निवडणुकांसंदर्भात जी अपेक्षा व्यक्त केली, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल'; असे सांगितले आहे.

याआधी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविषयी मिलिंद देवरा यांनी नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीत एखादा पक्ष त्याचा फायदा व्हावा म्हणून कृती करणार आणि काँग्रेसचे मोठे नुकसान करणार असेल तर त्याला विरोध करू असे मिलिंद देवरा यांनी सांगितले. महाविकास आघाडीमुळे नुकसान होत असल्यास काँग्रेस आघाडीचा धर्म पाळू शकणार नाही, असे सूतोवाच मिलिंद देवरा यांनी केले. 

मिलिंद देवरा यांची मुलाखत तसेच त्यांनी ट्वीट केलेले पत्र आणि त्याला उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला प्रतिसाद बघता मुंबई मनपा निवडणुकीसाठी मतदारसंघांची नव्याने रचना केली जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नव्याने रचना झाल्यास शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी