मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी - गुजराथी समाजाचे योगदान उल्लेखनीय : राज्यपाल

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 29, 2022 | 16:57 IST

मुंबई आणि  ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी – गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. 

Contribution of Rajasthani-Gujarati community in making Mumbai a financial capital is remarkable: Governor
मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी - गुजराथी समाजाचे योगदान उल्लेखनीय : राज्यपाल 
थोडं पण कामाचं
  • मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी - गुजराथी समाजाचे योगदान उल्लेखनीय : राज्यपाल
  • राजस्थानी मारवाडी समाजाने गोरगरिबांची सेवा केली
  • भारत देश हा शूरवीरांच्या बलिदानामुळे तसेच दानशूर लोकांच्या दातृत्वामुळे मोठा आहे

मुंबई : मुंबई आणि  ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी – गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. 


 
राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. २९) जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.  
 
चौक नामकरण सोहळ्याला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लवेकर व पंकज भोयर, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी प्रामुख्याने उपस्थित होते. 
 
आपल्या भाषणात राज्यपालांनी राजस्थानी समाजाच्या दातृत्वाचे कौतुक केले.  राजस्थानी मारवाडी समाजाने व्यवसाय करताना केवळ अर्थसंचय न करता शाळा, महाविद्यालये, इस्पितळे बांधली व गोरगरिबांची सेवा केली.  राजस्थानी मारवाडी समाज देशात सर्वत्र तसेच नेपाळ, मॉरिशस आदी देशांमध्ये देखील आहे असे सांगून जेथे जेथे हा समाज जातो तेथे तो आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरूप होतो असे राज्यपालांनी सांगितले. 
 
भारत देश हा शूरवीरांच्या बलिदानामुळे तसेच दानशूर लोकांच्या दातृत्वामुळे मोठा आहे असे सांगताना त्याग, बलिदान व सेवा यामुळेच जनतेचे प्रेम मिळते आणि म्हणून सर्वांनी समाजासाठी आपले योगदान दिले पाहिजे  असे राज्यपालांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी