Bhagat Singh Koshyari : राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त विधानांचा इतिहास, वाचा आजवरची विधानं

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि वादग्रस्त विधानं यांचं नातं जुनं आहे. आजवर अनेकदा त्यांनी वादग्रस्त विधानं केली आहेत.

Bhagat Singh Koshyari
राज्यपाल कोश्यारींचा वादाचा इतिहास  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचं वादग्रस्त विधान
  • यापूर्वीही अनेकदा केली होती वादग्रस्त विधानं
  • मुख्यमंत्री असतानाही आले होते अडचणीत

Bhagat Singh Koshyari : मुंबईतून गुजराती (Gujrati) आणि राजस्थानी (Rajasthani) माणसांनी आपला पैसा काढून घेतला तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी (Financial Capital Mumbai) राहणार नाही, असं वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यावर सर्वपक्षीयांनी टीका (Criticism) केली आहे. मात्र राज्यपलांनी असे वादग्रस्त विधान करण्याची ही काही पहिली वेळ नाही. आतापर्यंत अनेकदा त्यांनी अशी वादग्रस्त विधाने केली आहेत. जाणून घेऊया त्यांच्या वादग्रस्त विधानांचा इतिहास.

१. ताज्या विधानावरून वाद

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शुक्रवारी केलेल्या विधानावरून सध्या वाद सुरू आहे. एका चौकाच्या नामकरण समारंभात राज्यपाल कोश्यारींनी हे विधान केलं होतं. महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईबाबतचं हे विधान होतं. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांनी आपला पैसा काढून घेतला,तर मुंबईत पैसा शिल्लक तरी राहिल का, असा सवाल त्यांनी केला होता. मुंबईत गुजराती आणि राजस्थानी लोकांचं मोठं योगदान असून त्यामुळेच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याचं विधान त्यांनी केलं होतं. 

२. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंबाबत विधान

त्यापूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत विधान केलं होतं. सावित्रीबाईंच्या लग्नाविषयी बोलताना त्यांची जीभ घसरली होती. सावित्रीबाईंचं वयाच्या दहाव्या वर्षी लग्न झालं होतं. त्यावेळी ज्योतिबा फुले हे तेरा वर्षांचे होते. आता लग्न झाल्यावर या वयातील मुलं पुढे काय करतात, असा सवाल हसत हसत विचारून त्यांनी वाद ओढवून घेतला होता. त्यावरून राज्यात मोठा गदारोळ झाला होता.

अधिक वाचा - पाकिस्तानमध्ये १० चिनी नागरिकांचा मृत्यू, शरिफ सरकार देणार ९१ कोटी ३० लाख रुपयांची भरपाई

३. छत्रपती शिवरायांबाबत वादग्रस्त विधान

गुरुची महती पटवून देण्याच्या नादात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल आणि समर्थ रामदारांशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा कोण विचारेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व कमी लेखण्याचा आणि रामदास स्वामींना त्यांचं नसलेलं गुरुपद देण्याचा हा केवीलवाणा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली होती. 

अधिक वाचा - Breaking News 30 July 2022 Latest Update :राज्यपालांच्या वक्तव्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार समाचार, १ वाजता पत्रकार परिषद

४. बहुगुणांचा एकेरी उल्लेख

कोश्यारी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचा एकेरी उल्लेख करून त्यांनी वाद ओढवून घेतला होता. त्यावेळी कोश्यारी हे उत्तराखंडचे एक वजनदार नेते म्हणून प्रसिद्ध होते. बहुगुणा नेमके कोण आहेत, हे सिद्ध कऱण्यासाठी त्यांनी डीएनए टेस्ट करून घ्यावी, अशी शेलक्या भाषेत त्यांनी टीका केली होती. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. 

अधिक वाचा - Gujarat: गुजरातच्या भाजप सरकारमधील मंत्र्यावर बलात्काराचा आरोप

५. मास्क काढण्यावरून वाद

पुण्यातील एका कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते काही सायकलपटूंचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी एका महिलेच्या चेहऱ्यावरचा मास्क राज्यपालांनी स्वतःच्या हाताने खाली ओढला. देशभरात सगळे मास्क लावण्याचं आवाहन करत असतानाचा तो काळ होता. कोरोनाच्या लाटा त्यावेळी महाराष्ट्रात येत होत्या. यावरूनही त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी