cordelia cruise drugs Case : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित दोन अधिकारी निलंबित; NCB ची कारवाई

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 14, 2022 | 07:59 IST

नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो (Bureau of Narcotics Control) अर्थात एनसीबीने हलगर्जीपणाचं कारण देत दोन अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. हे दोन्ही अधिकारी अभिनेता (Actor) शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन (Aryan) याच्याशी संबंधित ड्रग्ज प्रकरणातल्या कारवाईमध्ये सहभागी होते.

Two officers suspended in Aryan Khan drugs case
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित दोन अधिकारी निलंबित  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुंबईतल्या कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने छापा टाकत ३ ऑक्टोबर रोजी आर्यन खानला अटक केली होती.
  • आर्यनसह इतर १७ जणांची जामिनावर सुटका झाली आहे.
  • आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्याविषयी अंमली पदार्थाशी संबंधित गुन्हे करण्याचा कट रचल्याचा कोणताही पुरावा नाही

मुंबई : नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो (Bureau of Narcotics Control) अर्थात एनसीबीने हलगर्जीपणाचं कारण देत दोन अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. हे दोन्ही अधिकारी अभिनेता (Actor) शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन (Aryan) याच्याशी संबंधित ड्रग्ज प्रकरणातल्या कारवाईमध्ये सहभागी होते. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन प्रकरणाशी संबंधित मुख्य तपास अधिकारी, अधीक्षक व्हीव्ही सिंह आणि गुप्तचर अधिकारी आशिष रंजन प्रसाद यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले. कामात हलगर्जीपणा आणि अनियमितता झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

एनडीटीव्हीने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. मुंबईतल्या कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने छापा टाकत ३ ऑक्टोबर रोजी आर्यन खानला अटक केली होती. तो आणि त्याच्यासह इतर १९ जणांना एनडीपीएस कायद्यांतर्गत अमली पदार्थ बाळगणं, त्यांचं सेवन करणं, त्यांची खरेदी विक्री करणं यासाठी आर्यनवर कारवाई करण्यात आली होती.

दरम्यान, या प्रकरणात आर्यनसह इतर १७ जणांची जामिनावर सुटका झाली आहे. मात्र दोघेजण अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत. जामीन देताना उच्च न्यायालयाने म्हटले होते की, आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्याविषयी अंमली पदार्थाशी संबंधित गुन्हे करण्याचा कट रचल्याचा कोणताही पुरावा नाही. त्यांच्यातील व्हॉट्सअॅपवरील संभाषणात काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याचं न्यायालयाने म्हटले होते. सर्व आरोपी बेकायदेशीर कृत्य करण्यास सहमत होते असा कोणताच सकारात्मक पुरावा न्यायालयाला खात्री पटवण्यासाठी रेकॉर्डवर नव्हता. हेच  जामीन देण्यामागचे कारण न्यायालयाने स्पष्ट केले. "केवळ आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा एकाच क्रूझमधून प्रवास करत असल्याने, हेच त्यांच्याविरुद्ध कट रचल्याचा आरोप होण्याचे कारण असू शकत नसल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी