Tanaji Sawant On Coronavirus: जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातही चिंता व्यक्त केली जात आहे. चीनमध्ये (China) तर कोरोनाचा उद्रेक (Coronavirus outbreak ) झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. (Coronavirus)रुग्णसंख्या प्रचंड वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकार अलर्टवर आले असून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पुन्हा एकदा आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांसह आणखी एक पत्र लिहिले आहे, मात्र राज्याचे आरोग्य मंत्री निवांत असल्याचं दिसत आहे. (Corona crisis: Welcome Christmas, New Year with a bang, Health Minister's green signal)
अधिक वाचा : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची सेटवर आत्महत्या
राज्यातून कोरोना हद्यपार झाला असून राज्यात केवळ 132 कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे जनतेने घाबरण्याचे काहीच कारण नाही’,असे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटले आहे. नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत धुमधडाक्यात करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अधिक वाचा : अनिल कपूर कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक
दरम्यान कोरोनाच्या वाढत्या संकटात राज्य सरकार आरोग्य यंत्रणा सज्ज करत आहे. कोरोनाच्या जुन्या यंत्रणेची तपासणी करण्यासाठी येत्या मंगळवारी मॉकड्रिल होणार आहे. संभाव्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी आपली आरोग्ययंत्रणा तयार आहे का, हे तपासले जाईल, असे सावंत सांगितले. तसेच नागरिकांना आवश्यक खबरदारी घ्यावी लागेल, असे ते म्हणाले.
कोरोनाचे संकट पुन्हा घोंगावत असताना नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःहून बंधने पाळावीत. सुरक्षित अंतर आणि मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. बंधने पाळून सण-उत्सव साजरे करावेत’,असेही त्यांनी पुण्यात बोलताना सांगितले.
या पार्श्वभूमीवर भारत सरकराने पहिले कठोर पाऊल उचलले आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांची एअरपोर्टवर RTPCR केली जाणार आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, बँकॉकमधून येणाऱ्या नागरिकांची RTPCR केली जाणार आहे. या टेस्टमध्ये कुणी पॉझिटीव्ह आढळलं, तर त्यांना क्वारंटाईनही केलं जाणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय ही माहिती दिली.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.