महाराष्ट्रात रेल्वेच्या ८७२ कर्मचारी आणि कुटुंबीयांना कोरोना

Railway employees tests covid19 positive: संपूर्ण देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात असल्याचं पहायला मिळत आहे. आता या कोरोनाने आपल्या विळख्यात रेल्वे कर्मचाऱ्यांनाही घेतलं आहे. 

corona_update
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • राज्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट 
  • मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या कर्मचारी, नातेवाईकांना कोरोना 
  • कोरोना झालेल्यांपैकी ८६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती 

Maharashtra Railway employees: मध्य रेल्वे (Central Railway) आणि पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) ८७२ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. इतकेच नाही तर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागल झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्यांपैकी ८६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना झालेल्या सर्व रुग्णांना उपचारासाठी पश्चिम रेल्वेच्या जनजीवन राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हे रुग्णालय एप्रिल महिन्यात कोविड-१९ रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आलं होतं.

कोरोनामुळे ८६ जणांचा मृत्यू

अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोना बाधित एकूण रुग्णांपैकी ५५९ बाधित हे मध्य रेल्वेचे तर ३१३ पश्चिम रेल्वेचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. तर कोरोनामुळे ८६ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी २२ रेल्वेचे कर्मचारी (मध्य रेल्वेचे १४ आणि पश्चिम रेल्वेचे ८ कर्मचारी) होते आणि इतर त्यांचे कुटुंबीय तसेच सेवानिवृत्त कर्मचारी होते. 
सध्य स्थितीत रेल्वेचे कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त १३२ रेल्वे कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

लोकल सुरू झाल्याने बाधितांची संख्या वाढली?

मध्य आणि पश्चिम रेल्वेतर्फे सध्या काही विशेष ट्रेन्स, मालवाहतूक ट्रेन्स आणि मर्यादित प्रवाशांसह काही ट्रेन्स अशा ७०० गाड्या चालवत आहे. काही रेल्वे कर्मचारी संघटनांनी दावा केला आहे की, १५ जून नंतर लोकल सेवा पुन्हा सुरू झाली आणि तेव्हापासून कोरोना बाधित रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे.

राष्ट्रीय रेल्वे मजदूर युनियनचे अध्यक्ष वेणू नायर यांनी सांगितले की, राज्य सरकारने कार्यालयांत केवळ १५ ते ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला मंजूरी दिली आहे. मात्र, उपनगरीय रेल्वे सेवा सुरू झाल्यापासून जवळपास १०० टक्के फील्ड कामगार कार्यरत आहेत.

तर झोनल रेल्वेच्या मते, कोविड-१९ बाधितांच्या संख्येत वाढ आणि रेल्वे सेवा पुन्हा सुरू करणे यांचा काही संबंध नाहीये. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्या मते, कोविड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि रेल्वे कर्मचारी, त्यांच्या नातेवाईकांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. कोविड-१९ महारोगराईनंतर मध्य रेल्वेने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी 'रेल परिवार देखरेख' मोहीम सुरू केली आहे. मश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाच्या डीआरएम यांनी या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी