Lockdown in Maharashtra : राज्यात कोरोनाचा स्फोट, दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याचे मिनी लॉकडाऊन लागण्याची शक्यता, लवकरच होणार निर्णय

राज्यात आणि देशात कोरोनाचे संकट पुन्हा वाढत आहे. दिवसेंविस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचे संकट असतना नवा व्हेरियंट ओमिक्रॉनने राज्याची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ओमिक्रॉनचे ७५ रुग्ण आढळले आहेत.

Multibagger Stock
थोडं पण कामाचं
 • राज्यात आणि देशात कोरोनाचे संकट पुन्हा वाढत आहे.
 • ओमिक्रॉनने राज्याची डोकेदुखी वाढली आहे.
 • ओमिक्रॉनचे ७५ रुग्ण आढळले आहेत

Lockdown in Maharashtra : मुंबई : राज्यात आणि देशात कोरोनाचे संकट पुन्हा वाढत आहे. दिवसेंविस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचे संकट असतना नवा व्हेरियंट ओमिक्रॉनने राज्याची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ओमिक्रॉनचे ७५ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध लादण्यात आले आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला असून सार्वजनिक ठिकाणी लस न घेतल्याला नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. (corona patient increased in maharashtra may mini lockdown imposed in state) 

मुंबई आणि पुणे शहरात मास्क न वापरणाऱ्य़ांवर आणि उघड्यावर थुंकणाऱ्य़ांवर जास्त दंड आकारण्यात येणार आहे. सामान्य नागरिकच नाही तर सरकारी कर्मचाऱ्य़ांनीही जर लस घेतली नसेल तर त्यांना सरकारी कचेऱ्य़ांमध्ये प्रवेश दिला जाणार नाहिये. राज्याचे नुकतेच विधीमंडळ अधिवेशन पार पाडले आहे, त्यात १३ मंत्री आणि ७० आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान राज्यात पुन्हा मिनी लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेऊन निर्बंध लावण्यात येणार आहे. सध्या दिल्लीत वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्याच प्रमाणे राज्यातही शनिवारी आणि रविवारी वीकेंड लॉकडाऊन लावण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. इतर दिवशीही आणि निर्बंध लावण्याचा विचार केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. 


पुढील निर्बंध लागण्याची शक्यता

 • चित्रपटगृह ५० टक्क्यांच्या क्षमतेने सुरू राहण्याची शक्यता
 • सरकारी कार्यालकात केवळ ५० टक्के कर्मचार्‍यांना प्रवेश
 • राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थितीची अट
 • लग्नकार्य ५० पाहुण्यांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता
 • पर्यटनास्थळावर निर्बंध किंवा बंदी
 • रात्रीची संचारबंदी, नियमांचे उल्लंघन केल्यास १४४ नुसार कारवाई
 • हॉटेल, बारच्या वेळांमध्ये बदल करून होम डिलिव्हरी आणि पार्सल नेण्याची मुभा
 • बाजारात गर्दी कमी करण्यासाठी कडक नियम
 • मेट्रो आणि बस ५० टक्के क्षमतेने सुरू राहण्याची शक्यता

 

वीकेंड लॉकडाऊनची शक्यता

राज्यात आणि मुंबईत कोरोनाचे संकट वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकार वीकेंड लॉकडाऊन लावण्याची शक्यता आहे. सोमवार ते शुक्रवार नियमांप्रमाणे सर्व सुरू राहणार आहे. तर वीकेंड लॉकडाऊनमध्ये गार्डन्स, पार्क, चौपाट्या, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे पुन्हा बंद करण्याची शक्यता आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी