Mumbai Corona : मुंबईत कोरोनाचा कहर, २४ तासांत आढळले दुप्पट रुग्ण, दिल्लीतही वाढला प्रादुर्भाव

Mumbai Corona देशात पुन्हा कोरोनाचे संकट वाढत आहे. नव्या व्हेरिंयट ओमिक्रॉनचे आव्हान असताना मुंबई आणि दिल्ली या दोन महानगरांत कोरोनाचे संकट पुन्हा वाढले आहे. गेल्या २४ तासात मुंबईत दुप्पट रुग्ण आढळले आहेत.

corona virus
कोरोनाचे संकट   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • देशात पुन्हा कोरोनाचे संकट वाढत आहे.
  • मुंबई आणि दिल्ली या दोन महानगरांत कोरोनाचे संकट पुन्हा वाढले आहे.
  • गेल्या २४ तासात मुंबईत दुप्पट रुग्ण आढळले आहेत.

Mumbai Corona : मुंबई : देशात पुन्हा कोरोनाचे संकट वाढत आहे. नव्या व्हेरिंयट ओमिक्रॉनचे आव्हान असताना मुंबई आणि दिल्ली या दोन महानगरांत कोरोनाचे संकट पुन्हा वाढले आहे. गेल्या २४ तासात मुंबईत दुप्पट रुग्ण आढळले आहेत. धारावीत १७ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. राजस्थानमध्येही २१७ दिवसानंतर सर्वाधिक रुग्ण आढळले असून त्यांची संख्या १३१ इतकी आहे. (corona patient increased in metro city mumbai and delhi )

मुंबईत कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. मुंबईत काल १ हजार ३७७ रुग्ण आढळले होते, आज मुंबईत १ हजार ५१० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनासमोर एक आव्हान उभे राहिले आहे. धारावीत १७ रुग्ण आढळले असून चिंता आणखी वाढली आहे. याप्रकरणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही चिंता व्यक्त केली आहे. अशाच प्रकारे मुंबईत कोरोना रुग्ण वाढण्याचे प्रमाण ५ टक्क्यांच्या पुढे गेले तर निर्बंध लावावे लागतील असे टोपे म्हणाले. 

आर्थिक राजधानी नंतर दिल्लीतही कोरोनाने डोकं वर काढले आहे. दिल्लीत ७० टक्क्यांहून अधिक कोरोनाचे प्रमाण वाढले आहे. दिल्लीत आतापर्यंत २३६ ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. सध्या दिल्लीत यलो अलर्ट लागू करण्यात आला असून चित्रपटगृह बंद करण्यात आले आहे. हॉटेल ५० टक्के क्षमतेने सुरू आहेत. तसेच लग्नात आणि मेट्रो प्रवासावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी