धक्कादायक! कोरोनाग्रस्त तरुणीची रुग्णालयातच आत्महत्या 

मुंबई
पूजा विचारे
Updated Apr 15, 2020 | 15:09 IST

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका 29 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरु होते.

corona virus
धक्कादायक! कोरोनाग्रस्त तरुणीची रुग्णालयातच आत्महत्या 

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत असतानाच धक्कादायक बातमीमुळे खळबळ उडाली आहे.
  • कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका 29 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
  • मुंबईतील नायर रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरु होते.

मुंबईः महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत असतानाच धक्कादायक बातमीमुळे खळबळ उडाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका 29 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरु होते. मंगळवारी रात्री कोविड-19 पॉझिटिव्ह असणाऱ्या तरुणीनं गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं आहे. 

पहाटे 3 वाजून 49 मिनिटांनी रुग्णालयातील बाथरुममध्ये या तरुणीनं ओढणीने गळफास घेऊन गळफास घेतला. 7 दिवसांपासून नायर रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. याची आग्रीपाडा पोलिसांत नोंद झाली असून पुढील तपास सुरु आहे.

कोरोनाची लक्षण दिसत असल्यानं नायर रुग्णालयात टेस्ट करण्यात आल्या. या टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं भीतीनं तरुणीनं आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. आत्महत्या केलेली तरुणी वरळीच्या जिजामाता नगरमधील रहिवासी होती. नायर रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 25 मध्ये तिच्यावर  उपचार करण्यात येत होते. कोरोनाची लागण होण्यापूर्वी या महिलेला दम्याचा आजार असल्याची माहिती सुत्रांकडून कळते.  नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

याआधी नाशिकमध्ये एका गृहस्थानं करोना झाल्याच्या नुसत्या संशयावरून आत्महत्या केली होती. तर, नगरमधील अकोले येथे एकानं रुग्णालयात स्वत:ला संपवलं होतं.

मंगळवारी मृत पावलेल्या 11 जणांमध्ये 3 महिला असून 8 पुरुष आहेत. यामध्ये सर्वात कमी वय असलेल्या 36 वर्षीय पुरुषाचा समावेश असून त्याला दम्याचा आजार होता. तर इतर नऊ जणांना मधुमेह, हृदयविकार, दमा असे आजार होते. तर दोन जणांना कसलाही आजार नव्हता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी