महाराष्ट्रात पुन्हा कोरोना निर्बंध लागणार, वडेट्टीवारांनी दिले संकेत

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 03, 2022 | 11:17 IST

Corona restrictions will be imposed again in Maharashtra, Vadettivar indicated : महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. एका आठवड्यात परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध लावायचे की नाही याचा निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतला जाईल, असे राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. 

Corona restrictions will be imposed again in Maharashtra, Vadettivar indicated
महाराष्ट्रात पुन्हा कोरोना निर्बंध लागणार, वडेट्टीवारांनी दिले संकेत  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात पुन्हा कोरोना निर्बंध लागणार, वडेट्टीवारांनी दिले संकेत
  • एका आठवड्यात परिस्थितीचा आढावा घेणार
  • मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्बंधांबाबतचे निर्णय घेणार

Corona restrictions will be imposed again in Maharashtra, Vadettivar indicated : महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. राज्यात ४५५९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. काल गुरुवार २ जून २०२२ रोजी राज्यात १०४५ कोरोना रुग्ण एक कोरोना मृत्यू यांची नोंद झाली तर ५१७ जण कोरोनामुक्त झाले. यामुळे एका आठवड्यात परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध लावायचे की नाही याचा निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतला जाईल, असे राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. 

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

राज्यात ज्या वेगाने कोरोना रुग्ण वाढत  ही परिस्थिती अशीच वाढत राहिली आणि निवडणूक काळामध्ये परिस्थिती हाताबाहेर असली तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलाव्या ही राज्य सरकारची भूमिका असेल.... या संदर्भात परिस्थिती पाहून निवडणूक आयोगाला विनंती केली जाईल... निर्णय निवडणूक आयोग घेईल; असे विजय वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवारांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मंदिर आंदोलन आणि ज्ञानव्यापी मंदिर यावरील भूमिकेचे स्वागत केले.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी