Corona third wave: मुंबई सीबीआय कोरोनाच्या ताब्यात; एकाचवेळी ६८ कर्मचारी पॉझिटिव्ह

मुंबई
भरत जाधव
Updated Jan 09, 2022 | 10:08 IST

राज्यातील कोरोनाचा (Corona) हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत (Mumbai) आता सामान्य नागरिकांसोबत प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणावर कोविडची (Covid) लागण होता आहे.

Corona third wave : Mumbai CBI 68 employees  Corona positive
मुंबई सीबीआय अडकली कोरोनाच्या जाळ्यात   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गेल्या ४८ तासांत कोरोनाग्रस्त दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
  • पोलीस दलातील तब्बल ४०० कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू
  • कोरोनाची बाधा झालेल्या ५७ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी रात्री मृत्यू झाला.

Mumbai  CBI BKC office  : मुंबई: राज्यातील कोरोनाचा (Corona) हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत (Mumbai) आता सामान्य नागरिकांसोबत प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणावर कोविडची (Covid) लागण होत  आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात नवीन निर्बंध लागू करण्यात आली आहेत. दिवसा जमावबंदी (Curfew)करण्यात आली तर रात्री संचारबंदी करण्यात आली आहे. अशात सीबीआय (CBI) कार्यालयाही कोरोनाच्या विळख्यात सापडल्याची बातमी हाती आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) बीकेसी कार्यालयातील ६८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती शनिवारी समोर आली आहे. 

सीबीआयकडून मुंबई महानगरपालिकेला (Mumbai Municipal Corporation) बीकेसी कार्यालयातील (BKC office) २३५ कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यास सांगण्यात आले होते. या चाचणीचा अहवाल शनिवारी समोर आला. यामध्ये ६८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. करोनाबाधितांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सध्या मुंबईत डॉक्टर्स, बेस्ट कर्मचारी आणि पोलिसांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांत मुंबई पोलीस दलांतील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

सध्या  पोलीस दलातील तब्बल ४०० कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृहखात्याने ५५ वर्षांवरील पोलिसांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले होते. तसेच गेल्या ४८ तासांत कोरोनाग्रस्त दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची बाधा झालेल्या ५७ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. तसेच मोटर परिवहन विभागात कार्यरत पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक महेंद्र भाटी यांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या १२५ वर पोहोचली आहे.

राज्यात कोरोनाचा उद्रेक, ४१ हजारांचा टप्पा ओलांडला

देशातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या महाराष्ट्रातील चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात शनिवारी दिवसभरात ४१,४३४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामध्ये १००९ ओमायक्रॉनबाधित रुग्णांचा समावेश आहे. तर १३ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा १,७३, २३८ वर जाऊन पोहोचला आहे. राज्यात सर्वाधिक रुग्णवाढ ही मुंबईत नोंदवली गेली आहे. शनिवारी दिवसभरात मुंबईत देशातील सर्वाधिक रुग्णवाढ झाली. एकट्या मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी २० हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत २०,३१८ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी