Corona Vaccination: सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनीही घेतली 'कोव्हिशिल्ड' लस, पाहा व्हिडिओ

मुंबई
सुनिल देसले
Updated Jan 16, 2021 | 13:59 IST

Adar Poonawalla receives shot of Covishield vaccine: देशभरात कोविड-१९ लसीकरणाला शुभारंभ झाला आहे. दरम्यान कोव्हिशिल्ड लस निर्मित केलेल्या सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनीही लस घेतली आहे. 

corona vaccination drive in india serum institute CEO adar poonawalla receives shot of covisheld vaccine
सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनीही घेतली 'कोव्हिशिल्ड' लस  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी स्वत: लस टोचून घेतली
  • लस घेतानाचा व्हिडिओ अदर पुनावाला यांनी केला ट्विट
  • सीरम इन्स्टिट्यूटने निर्मित केलेल्या कोव्हिशिल्ड लसीने देशभरात लसीकरण सुरू

मुंबई : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरणाचा शुभारंभ भारतात झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लसीकरणाचा शुभारंभ केला. त्यानंतर संपूर्ण देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Indistitute of India, Pune)ने निर्मित केलेली ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाची (Oxford University-AstraZeneca) 'कोव्हिशिल्ड' (Covishield) आणि भारत बायोटेकची (Bharat Biotech) 'कोव्हॅक्सिन' (Covaxin) या लसींद्वारे देशभरात लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. याच दरम्यान सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनीही आपल्याला स्वत:ला कोव्हिशिल्ड लस टोचून घेतली आहे.

लस घेतानाचा व्हिडिओ सुद्धा अदर पुनावाला यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी म्हटलं, "जगातील सर्वात मोठ्या कोविड-१९ लसीकरणाला सुरवात झाली आहे. मला मोठा अभिमान वाटत आहे की COVISHIELD या ऐतिहासिक प्रयत्नांचा एक भाग आहे. या लसीच्या सुरक्षिततेची आणि कार्यक्षमतेची माहिती देण्यासाठी मी लस घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये सहभागी झालो आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोविड-१९ लसीकरणाचा शुभारंभ केला. यानंतर देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ३६०० केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. पंतप्रधानांनी लसीकरणाचा शुभारंभ केल्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड सुविधा केंद्रावर राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

तीन टप्प्यांमध्ये लसीकरण

  1. पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखान्यातील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा समावेश आहे.
  2. दुसऱ्या गटात फ्रंटलाईन वर्करचा समावेश आहे ज्यात केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधील कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक, महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
  3. तिसऱ्या गटात ५० वर्षांवरील आणि ज्यांना अन्य व्याधी आहेत अशा ५० वर्षांखालील व्यक्तींचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी