Vaccination Registration : 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोनाची लस देताय? मग कशी कराल नोंदणी काय हवीत कागदपत्रे

मुंबई
भरत जाधव
Updated Jan 02, 2022 | 17:30 IST

Vaccination Registration : देशात कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेचा प्रभाव जाणू लागला आहे. हा वाढता धोका पाहता लहान मुलांना लसीकरण (Vaccination) सुरू करण्यात येणार आहे.

Vaccination Registration
कोरोना लसीकरण   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण
  • मुंबईत 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांची संख्या 9 लाख
  • आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र नसेल तर त्यांचे दहावीचे ओळखपत्रही पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार.

Vaccination Registration : मुंबई : देशात कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेचा प्रभाव जाणू लागला आहे. हा वाढता धोका पाहता लहान मुलांना लसीकरण (Vaccination) सुरू करण्यात येणार आहे. उद्यापासून म्हणजे 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला देशभरात सुरूवात होणार आहे. मुलांच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिकेसह (Mumbai Municipal Corporation) राज्यभरातील आरोग्य (Health) यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. या लेखात आपण  लसीकरणासाठी नोंदणी कशी करायची? याविषयी जाणून घेणार आहोत... 

देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत दरदिवशी वाढ होत आहे. ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातल्या मुलांचे लसीकरण सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेसह राज्यातील आरोग्य यंत्रणेने तयारी सुरू केली. मुंबईत 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांची संख्या 9 लाख असून 9 जम्बो कोरोना केंद्रात त्यांच्या लसीकरणाची सोय करण्यात आली आहे.

कशी कराल कोरोना लसीकरणाची नोंदणी?

  • सर्व प्रथम Covin App वर जाऊन लॉग इन करा.
  • मुलाचं नाव, जेंडर आणि जन्मतारीख निवडा.
  • तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्रांची यादी येईल.आता लसीकरणाची तारीख, वेळ आणि लस निवडा.
  • लसीकरण केंद्रावर जाऊन संदर्भ आयडी, सीक्रेट कोड सांगा आणि लस घ्या.

महत्वाचे म्हणजे ज्या मुलांकडे आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र नसेल तर त्यांचे दहावीचे ओळखपत्रही पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. इतकेच नाही तर ऑनलाईन नोंदणीशिवाय वॉक इन नोंदणीचा पर्यायही देण्यात आला आहे. तर मग वाट कसली पाहता? कोरोविरोधातल्या लढाईचा भाग म्हणून प्रत्येक किशोरवयीन मुलाने लस घ्यायलाच हवी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी