सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी, 'इतके' रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई
पूजा विचारे
Updated Apr 10, 2020 | 08:18 IST

इस्लामपुरचे आणखी 12 कोरोनाबाधित रुग्ण हे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे 26 पैकी आता 22 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमी होऊन 4 वर आला आहे.

sangli corona virus update
सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी, 'इतके' रुग्ण कोरोनामुक्त 

थोडं पण कामाचं

  • राज्यभरात कोरोनाचं थैमान सुरु असताना सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
  • इस्लामपुरचे आणखी 12 कोरोनाबाधित रुग्ण हे पूर्णपणे बरे झाले आहेत.
  • सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमी होऊन 4 वर आला आहे.

सांगलीः राज्यभरात कोरोनाचं थैमान सुरु असताना सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकीकडे  राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना सांगलीकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इस्लामपुरचे आणखी 12 कोरोनाबाधित रुग्ण हे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे 26 पैकी आता 22 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमी होऊन 4 वर आला आहे. त्यामुळे सांगलीकरांसह प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

या 22 रुग्णांच्या दोन्ही टेस्टचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला आहे. सांगलीचे सिव्हिल सर्जन डॉ. संजय साळुंखे यांनी याबाबत माहिती दिली आहे.   या 22 कोरोनामुक्त रुग्णांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. मात्र, नियमानुसार त्यांना काही दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावं लागेल. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ही एक सकारात्मक घटना घडली आहे.

जिल्ह्यात केवळ 4 कोरोनाबाधित

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधील कोरोनाबाधितांचा आकडा 26 पोहोचला होता. गुरुवारी 16 कोरोनाबाधित रुग्णांची दुसरी चाचणी घेण्यात आली होती. रात्री उशिरा त्यापैकी 12 रुग्णांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आलेत. आता केवळ चार कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांच्यावर मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णांमध्ये एका दोन वर्षांच्या चिमुरड्याचा समावेश आहे.

चार दिवसांपूर्वीच कोरोनामुक्त झाल्याने चार जणांना डिस्चार्ज देऊन इन्स्टिट्यूट क्वारंटाईनमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे 22 रुग्णांची संख्या मिरजेतील रुग्णालयात होती. त्यानंतर 6 जणांचे दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आली तर बुधवारी आणखी 6 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले. त्यामुळे सांगलीचा कोरोना बाधितांचा आकडा 10 ने कमी होऊन 16 वर पोहोचला होता. गुरुवारी 16 पैकी 12 जणांचे दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे इस्लामपुरचा कोरोनाचा 26 त्यांनतर 22, मग 16 वर असणारा आकडा आता केवळ 4 वर आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे.

दरम्यान, सौदी अरेबियातून 13 मार्च रोजी भारतात दाखल झालेल्या चौघा मनेर कुटुंबियांना पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर 14 मार्च रोजी इस्लामपूर या गावी आल्यानंतर त्यांच्या संपर्कात येऊन त्यांच्यासह 26 जणांना कोरोची लागण झाली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी