Shivrajyabhishek : किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात; कोरोनाचे निर्बंध नसल्याने लाखो शिवप्रेमींची गर्दी

मुंबई
भरत जाधव
Updated Jun 06, 2022 | 10:26 IST

महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेकाचा (Rajyabhishek) सोहळा (Ceremony )आज सोमवारी किल्ले रायगडावर संपन्न होत आहे. दरवर्षी ६ जून रोजी शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. यंदाही या सोहळ्याच्यानिमित्ताने किल्ले रायगडावर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमींची गर्दी दिसत आहे.

Coronation Ceremony begins at Fort Raigad
किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला रायगडवर जल्लोष
  • शिवप्रेमींसाठी भोजन, पार्किंगची सुविधा उपलब्ध
  • थोड्याच वेळात रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार

रायगड: महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेकाचा (Rajyabhishek) सोहळा (Ceremony )आज सोमवारी किल्ले रायगडावर संपन्न होत आहे. दरवर्षी ६ जून रोजी शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. यंदाही या सोहळ्याच्यानिमित्ताने किल्ले रायगडावर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमींची गर्दी दिसत आहे. छत्रपती घराण्याचे वंशज असलेले संभाजीराजे छत्रपती काहीवेळापूर्वीच किल्ले रायगडावर दाखल झाले आहेत. आता थोड्याच वेळात रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार आहे. 

raigad (Photo- Facebook )

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा नीटपणे साजरा करता आला नव्हता. मात्र, यंदा कोरोनाचे निर्बंध नसल्याने लाखो शिवप्रेमी रायगडावर हजेरी लावण्याची शक्यता आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला रायगडवर जल्लोष, ढोल ताशांचा गजर अन् फटाक्यांची आतीषबाजी पाहायला मिळाली होती. कालपासून रायगडावर या सोहळ्याची लगबग सुरु आहे.

raigad

(Photo- Facebook)

संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करून शिवप्रेमींसाठी रायगडावर करण्यात आलेल्या सुविधांची माहिती दिली होती. गडावर अन्नछत्र चालू असून, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह , याचबरोबर निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

raigad

गडाच्या पायथ्याला वाहनतळ, मोफत शटल बससेवा, अन्नछत्र उभारण्यात आल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली.

raigad

वाहनांच्या पार्किंगासाठी सुविधा

पोलिसांकडून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या लोकांची तीन भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यापैकी पहिला मार्ग हा सातारा-कोल्हापूरकडून येणारा आहे. सातारा, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, नातेखिंड मार्गे स्वत:ची वाहने घेऊन येणाऱ्या शिवप्रेमींसाठी कोंझर-१ आणि कोंझर २ इथे वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, वाळसुरे १ येथेही पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 

याठिकाणी वाहने पार्क करून शिवप्रेमींना एसटीच्या शटल सेवेने रायगडाच्या दिशेने जाता येईल. कोंझर ३ ते पाचाड अशी एसटीची शटल सेवा सुरू राहील. एसटीने पाचाडपर्यंत पोहोचल्यानंतर शिवप्रेमींना किल्ले रायगडापर्यंतचा प्रवास पायीच करावा लागेल. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली रोप वे सेवा राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी सुरू ठेवण्यात आली आहे.

तर दुसरा मार्ग हा मुंबईहून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी आहे. मुंबई, माणगाव, दालघर फाटा, कवळीचा मार्ग आणि सोनजई मंदिर असा हा प्रवास असेल. मुंबईकडून येणाऱ्या शिवप्रेमींच्या वाहनांसाठी सोनजई मंदिराच्या परिसरात पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तर पुणे, ताम्हणी घाट, निजामपूर आणि सोनजई मंदिर असा प्रवास करत येणाऱ्या शिवभक्तांसाठीही याच ठिकाणी पार्किंगची सोय असेल. कवळीचा मार्ग आणि सोनजई येथून एसटीची शटल सेवा सुरु असेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी