खुशखबर, राज्यातील जीवनावश्यक वस्तुंची दुकाने २४ तास उघडी राहणार

मुंबई
Updated Mar 26, 2020 | 20:21 IST

सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

coronavirus cm uddhav thackeray essential good shop will open 24 hrs in state
खुशखबर, राज्यातील जीवनावश्यक वस्तुंची दुकाने २४ तास उघडी राहणार  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी ठेवणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती
  • नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून घेतला निर्णय
  • कुठेही गर्दी होता कामा नये अशा सूचना

मुंबई : सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

आज वर्षा येथे कोरोना उपयाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात यावर चर्चा झाली.

लॉक डाऊन मुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे, त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य खरेदी करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळाव्यात, असेही यासंदर्भात झालेल्या बैठत ठरले.

मुख्यमंत्र्यांचेही सोशल डिस्टन्सिंग 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या स्वतःही सोशल डिस्टन्सिंग करताना दिसत आहे. ते हे प्रकर्षाने पाळथ आहे. आज मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर अधिकाऱ्यांच्या बैठकीवेळी सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आली. दोन अधिकाऱ्यांमध्ये किमान दोन फुटांचे अंतर ठेवण्यात आले. हिरवळीवर घेण्यात आलेल्या या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...