covid cases in India in last 24 hours today: देशभरात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. वाढती कोरोना बाधितांची संख्या पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहिलं आहे. आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या राज्यांना पत्र लिहून अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच फाईव्ह फोल्ड स्ट्रॅटेजी अंतर्गत टेस्ट, ट्रीट, ट्रॅक, कोविड एप्रोपिएट बिहेविअर आणि वॅक्सिनेशन या रणनितीचं पालन करण्याचे निर्देशही दिले आहेत.
हे पण वाचा : उन्हाळ्यात या फुलाचे पाणी तुमच्यासाठी ठरेल संजीवनी
कोरोना विषाणूच्या वाढत्या संख्येने पुन्हा एकदा दहशत वाढवली आहे. चार महिन्यांनंतर एका दिवसात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या नोंद झाली आहे. गेल्या काही आठवड्यांत कोविड-19 बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यासोबतच H3N2 विषाणूचा संसर्ग झालेल्यांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. हेच लक्षात घेता केंद्र सरकारने 6 राज्यांना मायक्रो लेवलवर स्थितीवर नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
हे पण वाचा : व्यायाम करण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार, भारतात गुरुवारी (16 मार्च 2023) एका दिवसात 754 कोरोना बाधितांची नोंद झाली. देशभरात सध्या 4623 सक्रीय रुग्ण आहेत. यापूर्वी गेल्यावर्षी 12 नोव्हेंबर रोजी देशभरात कोरोनाचे 734 सक्रीय रुग्णांची एका दिवसात नोंद झाली होती.
हे पण वाचा : हाता-पायाला मुंग्या येतात? जाणून घ्या घरगुती आणि रामबाण उपाय
महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. 2 मार्च ते 8 मार्च या आठवड्याच्या तुलनेत 9 मार्च ते 15 मार्च या आठवड्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. त्यातही राज्यातील सात जिल्ह्यांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. पुणे, मुंबई शहर, ठाणे, मुंबई उपनगर, नाशिक, अहमदनगर, नागपूर या जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.
हे पण वाचा : दूध प्यायल्याने कॅन्सर होऊ शकतो?
जिल्हा | आठवड्यातील रुग्णसंख्या | |
2 मार्च ते 8 मार्च | 9 मार्च ते 15 मार्च | |
पुणे | 159 | 222 |
मुंबई | 70 | 130 |
ठाणे | 45 | 117 |
मुंबई उपनगर | 20 | 31 |
नाशिक | 17 | 26 |
अहमदनगर | 13 | 23 |
नागपूर | 2 | 17 |
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात आठ मार्चपर्यंतच्या आठवड्यात 355 रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, 15 मार्चपर्यंत ही संख्या वाढून 688 वर पोहोचली. महाराष्ट्रासोबतच गुजरातमध्ये सुद्धा रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. तेलंगणामध्ये संक्रमण दर 0.31 टक्के, तमिळनाडूत 1.99 टक्के, केरळात 2.64 टक्के आणि कर्नाटकात 2.77 टक्के इतका आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.