Coronavirus चा राज्यातला धोका वाढला, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 14 वर  

मुंबई
पूजा विचारे
Updated Mar 13, 2020 | 07:50 IST

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या आता 14 वर पोहोचली आहे.  तो ३५ वर्षांचा आहे. फ्रान्सहून तो परत आला आहे.  त्याला कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

Coronavirus: राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 14 वर  
Coronavirus: राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 14 वर    |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या आता 14 वर पोहोचली आहे.
  • तो ३५ वर्षांचा आहे. फ्रान्सहून तो परत आला आहे.  
  •  त्याला कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या आता 14 वर पोहोचली आहे.  तो ३५ वर्षांचा आहे. फ्रान्सहून तो परत आला आहे.  त्याला कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.  दिवसेंदिवस राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.  गुरुवारी दिवसभरात 3 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.  यात हिंदूजा रुग्णालयात भरती असलेला आणि दुबईहून आलेल्या 64 वर्षाचा पुरुष रुग्णाचा समावेश आहे. मुंबईतील रुग्णाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याआधी अमेरिकेहून आलेल्या पुण्याच्या 33 वर्षीय पुरुषालाही कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या आता 14 झाली आहे.  त्यामुळे पुण्यात 9, मुंबईत 3, ठाणे आणि नागपुरात एक कोरोनाबाधित रूग्ण सापडला आहे. सर्व कोरोना बाधित रुग्णांच्या कुटुंबीयांसह निकटवर्तीयांचाही शोध युध्दपातळीवर सुरु आहे. आज राज्यात एकूण 50 नवीन संशयित भरती झाले आहेत, असी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दुबईहून आलेल्या एका दांपत्याला पुण्यात प्रथम कोरोना व्हायरस असल्याचं उघड झालं.  त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी काही जण कोरोना पॉझिटिव्ह सिद्ध झाले. पुण्यातील नऊपैकी सात कोरोनाबाधित हे दुबईला फिरायला गेले होते, तर आठवा रुग्ण त्यांना मुंबई एअरपोर्टवरून पुण्याला घेऊन येणारा ड्रायव्हर होता.  तसंच पुण्यातील नववा रूग्ण हा यांच्या संपर्कातील नसून हा रूग्ण एक मार्च रोजी अमेरिकेहून भारतात परतला होता. तसेच ठाण्यातील कोरोनाबाधित रूग्ण फ्रान्सवरून परतला आहे. अशातच मुंबईतील तिसरा कोरोनाबाधित रूग्ण वृद्ध असून तो दुबईवरून परतला आहे.

प्रवाशांची तपासणी 

12 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत 1295 विमानांमधील 1 लाख 48 हजार 706 प्रवासी तपासण्यात आलेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार राज्यातील या 3 प्रमुख विमानतळांवर सर्व देशांहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी राज्यातील करण्यात येत आहे. 

भारतात कोरोना व्हायरसमुळे पहिला मृत्यू 

देशात कोरोना व्हायरस पसरत असताना त्यात आता कर्नाटकमध्ये या आजारामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनामुळे देशात झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. कर्नाटकातील कलबुर्गी येथील रहिवासी असलेल्या एका ७६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याला कोरोना व्हायरासची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी