कोरोना विषाणू : राज्यातील 41 प्रवाशांपैकी 40 जणांचा अहवाल निगेटिव्ह

कोरोना विषाणू बाधित भागातून आलेल्या राज्यातील 41 प्रवाशांपैकी 40 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. रुग्णालयात निरिक्षणाखाली दाखल असलेल्या 41 पैकी 39 जणांना घरी सोडण्यात आले आहे

coronavirus update in maharashtra 40 patient negative rajesh tope
 कोरोना विषाणू : राज्यातील 41 प्रवाशांपैकी 40 जणांचा अहवाल निगेटिव्ह  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • मुंबई विमानतळावर आतापर्यंत २७ हजार ८९४ प्रवाशांची तपासणी
  • सध्या पुणे, मुंबई येथे प्रत्येकी एक जण दाखल आहे.
  • राज्यातील 41 प्रवाशांपैकी 40 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

मुंबई : कोरोना विषाणू बाधित भागातून आलेल्या राज्यातील 41 प्रवाशांपैकी 40 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. रुग्णालयात निरिक्षणाखाली दाखल असलेल्या 41 पैकी 39 जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या पुणे, मुंबई येथे प्रत्येकी एक जण दाखल आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत २७ हजार ८९४ प्रवासी तपासण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.  

राज्यात बाधित भागातून १७३ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ९० प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ४१ जणांना भरती करण्यात आले होते. त्यामध्ये काल संध्याकाळी एका प्रवाशाला सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळल्याने पुणे येथील नायडू रुग्णालयात भरती करण्यात आले तर एकाला मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आले. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी ४० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन आय व्ही पुणे यांनी दिला आहे. एका प्रवाशाचा प्रयोगशाळा अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होईल. 

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार चीन येथून येणा-या सर्व प्रवाशांना भरती करण्याचे आणि त्यांचे प्रयोगशाळा निदान करण्याचे धोरण राज्यात राबविण्यात येत आहे. इतर बाधित भागातून येणा-या प्रवाशांचा पाठपुरावा १४ दिवसांकरता करण्यात येतो आहे.
  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी